अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि26) रोजी जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षा 35 उपकेंद्रावर सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता एकुण 8 हजार 894 परिक्षार्थी पैकी 7 हजार 157 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 1 हजार 797 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
एमपीएससी परिक्षेकरीता कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आले होते. परिक्षेकरीता उपस्थित परिक्षार्थींना तसेच परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क, सॅनिटायर, फेसशिल्ड इत्यादी साहित्य पुरविण्यात आले होते. तसेच नियुक्ती अधिकारी यांना प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी पाच पीपीई किट पुरविण्यात आले. परिक्षाकरीता आलेल्या प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग व परीक्षा केंद्र सॅनिटाईझ करण्यात आले होते.
एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, भुसंपादन अधिकारी विश्वनाथ घुगे, स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाचे सहायक संचालक दि.अ.जवंजाळ, तहसिलदार सुनिल पाटील, निलेश मडके, संतोष येवलीकर, खरेदी अधिकारी बळवंत अरखराव, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सु.व्ही गोहाळ व विज्ञान व सुचना अधिकारी अनिल चिचोंले यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले. तसेच परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त पुरविण्याता आला होता.













