स्व. अरुणजी दिवेकर स्मृतिदिनानिमित्त जुन्या आठवणींच्या उजाळ्यात अभिवादन कार्यक्रम संपन्न
अकोला : महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री स्वर्गीय अरुणजी दिवेकर यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त जुन्या आठवणींच्या उजाळ्यात हा अभिवादन कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बंडू शिरसागर सर यांनी भूषवले. स्व. अरुणजी दिवेकर हे नाव अकोल्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याशी जोडलेले आहे. क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी राज्यात अनेक क्रीडांगणे, युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, तसेच ग्रामीण क्रीडा विकासासाठी विधायक योजना राबविल्या. समाजसेवा, शिक्षण, पत्रकारिता, आणि लोकसंपर्क या सर्व क्षेत्रात त्यांचा बहुआयामी ठसा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.
कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कार्याच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. विनायक राव पांडे काका, अनिल भाऊ कौशल, सुभाष सातव, महादेव मेहगे, अँड. सुनिल काटे, नरेंद्र शास्ती, दिलीपराव देशपांडे, जयंतराव सरदेशपांडे, डॉ. स्नेहा गोखले, निलेश देव, शशिकांत हिवरखेडकर, सुनिल मानकर, इस्माईल टिव्हीवाले, विजय ठोकळ, पंकज देशमुख,हजारे काका, राजु टाकरकर, स्व.अरुणजी दिवेकर यांच्या वर प्रेम करणारे चाहते वर्ग यांच्यासह निलेश देव मित्र मंडळाचे कार्यकारी सदस्य उपस्थित होते.
आपल्या भाषणात निलेश देव यांनी स्व. अरुणजींच्या कार्याची उजळणी करताना सांगितले की, स्व. अँड. धनश्री देव यांनी २०१३ मध्ये स्व. अरुणजी दिवेकर मार्ग नामकरण सोहळा आणि पोस्टाचे तिकीट प्रकाशन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. या सर्व कार्यामागे माजी उपमहापौर निखीलेश भाऊ दिवेकर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे होते. भविष्यात स्व. अरुणजी दिवेकर यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्यगौरवाचा विशेष प्रकाशन निलेश देव मित्र मंडळातर्फे होणार आहे. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, हे प्रकाशन म्हणजे दिवेकर साहेबांच्या कार्याचा गौरव आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणेचा दीप असेल. हे यश साध्य करण्यासाठी निखीलेश भाऊ आणि दिवेकर साहेबांच्या परिवाराची साथ आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. स्नेहा गोखले यांनी भावपूर्ण सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण केली आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. उपस्थितांनी दिवेकर साहेबांच्या कार्याला विनम्र अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
Post Views: 50