नौपाडा पोलिस ठाण्यात मार्गदर्शनपर सुसंवाद सेमिनार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Aug 2022, 9:26 AM
   


ठाणे.... नौपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने दि.२७ ऑगस्ट रोजी विद्या प्रसारक मंडळ ठाणे लॉ कॉलेजच्या कायदे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता सेमिनार आयोजित करण्यात आला होता. 

   सदर सेमिनार मध्ये  **पोलीस प्रशासन कार्यपद्धती व दैनंदिन जीवनातील पोलीस व वकिल यांची भूमिका**  ह्या विषयावर वरिष्ठ ठाणेदार संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी १२:०० वा. पासून ते १५:३० वा. पर्यत सविस्तर मार्गदर्शन व सुसंवाद करण्यात आला. 

सदर सेमिनारकरीता निवृत्त पोलीस उपआयुक्त नागेश लोहार व ठाणे लॉ कॉलेजचे प्राचार्य वाघ सर आदी उपस्थित होते. सदर सेमिनारास ठाणे लॉ कॉलेजचे ४० विद्यार्थी  उपस्थित होते.

    Post Views:  219


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

आई

४२ मिनेट