गोरगरीब बेस्ट कामगारांना वाचविण्यासाठी पांडुरंगाच्या रूपाने श्री प्रताप सरनाईक धावुन आले


उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व परिवहन मंत्री श्री प्रतापराव सरनाईक साहेब यांनी बेस्ट कामगारा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jun 2026, 11:16 AM
   

 ​बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि संपावर तोडगा काढण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे उपस्थितीत परिवहन मंत्री श्री प्रतापराव सरनाईक साहेब यांचे पुढाकाराने नेतृत्वाखाली संयुक्त बेस्ट कामगार कृती समीती नेते, व परिवहन मंत्री श्री प्रतापराव सरनाईक साहेब यांचे निकटवर्तीय श्री गजानन नागे यांच्या विनंतीवरून अथक प्रयत्नाने  शासकिय सह्याद्री अतिथीगृहात बेस्ट कामगारांचे विषयावर बैठक पार पडली  ऐतिहासिक बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे घेण्यात आले आहेत:
​१) वेतन करार संदर्भात: बेस्ट प्रशासनाशी येत्या ७ दिवसांत चर्चा करून वेतन करार केले जातील. तोपर्यंत कायम कामगारांना अंतरिम वाढ म्हणून ₹३,०००/- देण्याचा निर्णय झाला आहे. वेतन करार झाल्यावर ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुकसान  असेल.
 २) वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना ₹२,०००/- मासिक हंगामी वाढ दिली जाईल. तसेच समान काम समान वेतन नुसार कायद्याच्या चौकटीत राहून सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्यात येणार या वेतनश्रेणी नुसार कांत्रटी कामगारांना ३८ हजार वेतन वाढ होईल, 
३) बजेट विलीनीकरणाबाबत: अधिवेशन संपल्यानंतर लगेचच कायदेशीर तसेच तत्त्वतः मंजुरी देण्यात येईल. यासाठी  युडीसी सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन त्वरित प्रक्रिया सुरू केली जाईल. 
४) सेवा निवृत्त कामगारांच्या सर्व ग्रॅच्युईटी संदर्भात देणी: ३१ मार्च २०२७ पर्यंत १००% देऊन पुर्ण रक्कम देण्यात येईल.
५) बेस्ट उपक्रमाच्या ५००० नवीन बसेस: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने ५,००० नवीन बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्याचा अधिकृत निर्णय झाला आहे.
६) कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी: वयोमर्यादा आणि सेवा अनुभव पाहून त्यांना बी ई एस टी च्या कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा तत्त्वतः निर्णय झाला आहे. यासाठी सेवा भरती प्रक्रिया वयोमर्यादा शिथिल करून १०% गुण अधिक देऊन बेस्ट सेवेत सामावून घेतले जाईल,
७)  कामगारांचा प्रलंबित करार २०१६-२०२१  हा पुर्ण करुन संपूर्ण एरिअस थकित रक्कम देण्यात येईल तसेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुकसान २०२१-२०२६ चा करारांवर सात दिवसांत चर्चा सुरू करून करार केला जाईल कामगारांचे बंद केलेले भत्ते,एलटीए,प्रोमोशन ग्रेडेशन नियमानुसार देण्यात येणार, गेली पाच वर्षे कामगारांना वेतन वाढ झाली नाही याप्रश्नावर गजानन नागे यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली, यावर सात दिवसांत चर्चा सुरू करण्यात येणार 
८) संप काळातील कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही: संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर आकसाने कारवाई केली जाणार नाही. झालेल्या कारवाई मागे घेण्यात येणार असे परिवहन मंत्री श्री प्रतापराव सरनाईक साहेब यांनी जाहीर केले,
९) वेटलिज गाड्यांची तपासणी वेळोवेळी करण्याचे आदेश देण्यात आले,
१०) पीपीपी तत्वावर आधारित आगार बस स्थानक, विकसित करण्याचे मुद्यावर चर्चा करण्यात आली बेस्ट ची जमिन विकणार नाही, विकास आराखडा तयार करून कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली त्यासमीती मध्ये युनियन प्रतिनिधी व कामगारांचा समावेश असेल संयुक्तपणे विकास आराखडा तयार केला जाईल.
११) बेस्ट उपक्रमाच्या उत्पादन वाढीसाठी विद्युत पुरवठा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला जाईल, 
​या बैठकीला परिवहन मंत्री श्री. प्रतापराव सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी गजानन नागे, उदयकुमार अंबोलकर रंगा सातवसे, नितीन नांदगावकर, उमेश सारंग, विलास पवार, पवन गायकवाड, गौरीशंकर खोत, संतोष काटकर, महादेव खाडे, विजय कुलकर्णी, बेस्ट कामगार कृती समीतीचे सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर कृती समितीने आपला संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भातील संपूर्ण लेखी माहिती (मिनिट्स) उद्या दुपारपर्यंत उपलब्ध होईल.
​विशेष आभार:
भाजप बेस्ट कामगार संघ मुंबई सरचिटणीस श्री. गजानन नागे यांचे अथक प्रयत्नाने निकटवर्तीय परिवहन मंत्री कार्यासम्राट नेतृत्व श्री प्रतापराव सरनाईक साहेब यांच्या पुढाकाराने नेतृत्वाखाली मार्गदर्शनात कामगारांच्या हक्कासाठी मागण्या मान्य झाल्या हा ऐतिहासिक क्षण फक्तना फक्त परिवहन मंत्री कार्यासम्राट नेतृत्व श्री प्रतापराव सरनाईक साहेब यांच्या पुढाकारातून साकार झाला, साक्षात श्री पांडुरंगाच्या रूपाने देव श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्यात दिसला, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व परिवहन मंत्री श्री प्रतापराव सरनाईक साहेब व सर्व शासकीय अधिकारी व बेस्ट संयुक्त कामगार कृती समीती नेते यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार!

    Post Views:  21


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व