लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदावर मोहन शेळके
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Aug 2022, 8:55 AM
अकोला : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या अकोला जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर सायंदैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट चे संपादक श्री मोहन शेळके यांची नियुक्ती करण्यात आली.अकोल्यात जैन रेस्ट्रोमध्ये झालेल्या विचारमंथन मेळाव्यापूर्वी केंद्रीय कार्यकारिणीच्या झालेल्या विशेष सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी नंतर सुरू झालेल्या विचारमंथन आणि स्नेहमिलन मेळाव्यात ही घोषणा केली.याप्रसंगी त्यांनी मोहन शेळके यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचे उपस्थित सर्व पदाधिकारी व सभासदांकडून अभिनंदनासह सानंद स्वागत करण्यात आले.
श्री मोहन शेळके हे एक मेहनती,सेवाभावी आणि सरळमार्गी अनुभवसिद्ध पत्रकार असून संघटनेच्या विकासाची त्यांची तळमळ आणि संकल्पनांचा विचार संघटनकार्याची गती वाढविण्यासाठी त्यांच्या योगदानाची निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांच्या नियुक्तीबाबत बोलतांना अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 396