डॉ.अशोक शिरसाट : व्यक्ती आणि वाङ्ममय या आस्वादक समिक्षा ग्रंथाची राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी निवड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Dec 2024, 9:23 AM
   

अकोला - डॉ. अशोक शिरसाट : व्यक्ती आणि वाङ्ममय डॉ.श्रीकांत पाटील लिखीत हृदय प्रकाशन, पोहाळे,कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेल्या आस्वादक समिक्षा ग्रंथास कोल्हापूरच्या त्रैमासिक वारूळच्या वतीने देण्यांत येणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार नुकताच जाहिर झाला असून एका शानदार राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार लवकरच प्रदान करण्यांत  येणार आहे. असे त्रैमासिक वारूळ, कोल्हापूरचे आयोजक डॉ.सतेज दणाणे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. सन २०२२-२०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या २१९ साहित्यकृतीं प्राप्त झाल्याचे डॉ. सतेज दणाणे यांनी सांगितले.पैकी मोजक्याच साहित्य कृतींना राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यांत येणार असल्याचे कळविण्यांत आले आहे.

    Post Views:  10


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व