सरेवाडी प्राथमिक शाळेत मूल्यांची दहीहंडी साजरी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Aug 2022, 9:00 PM
   

   जि.प.प्राथ.सरेवाडी (नायफड) शंभर टक्के आदिवासी क्षेत्र,भीमाशंकर च्या पायथ्याशी वसलेली शाळा येथे दहीहंडी साजरी  करण्यात आली.गोविंदा आला रे आला.... गोकुळात आनंद झाला. बोल बजरंग बली की जय या गाण्याच्या तालावर येथील प्राथमिक शाळेतील बालचमू गोविंदांनी दहीहंडीचा आनंद लुटला.
    विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा.श्रीकृष्ण बाललीलांचे प्रतीक म्हणून दहीहंडी साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे.दहीहंडी उत्सवावर विद्यार्थ्यांनी दहा मूल्यांच्या पताका लावल्या होत्या. श्रमप्रतिष्ठा,नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वधर्मसमभाव इ. दहीहंडीतून संदेश दिले होते इयत्ता पहिलीचा विद्यार्थी श्रीकृष्ण बनून सार्थक ठोकळ याने याप्रसंगी हंडी फोडली.  शाळेचे मुख्याध्यापक श्री. बापूराव दराडे, श्री. एकनाथ ठोकळ, अंगणवाडीताई  सौ.सुलाबाई ठोकळ, ॲड रोहित ठोकळ, श्री.सचिन ठोकळ, श्री.निलेश ठोकळ, सौ.कुसुमताई ठोकळ,सौ. अनिताताई ठोकळ उपस्थित होते. श्री. विजयकुमार शेटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.

    Post Views:  353


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व