रक्षाबंधन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Aug 2022, 2:35 PM
   

राखी प्रेमाच्या नात्याची बांधूया विश्वासाच्या धाग्यात ऋणानुबंध जुळती मायेने वंचित नसावे कुणी जगात

जुळावे बंध राखी चे अट नसावी रक्ताची
 स्नेहबंध हवे जिव्हाळ्याचे ओळख हृदय नेत्राची

सैनिक लढतो देशासाठी कर्तव्य तयाचे महान
 नात्यांना देऊन तिलांजली झटतो हाच बहिनीचा सन्मान

पोलीस उन्हातान्हात 
रात्रंदिन तत्पर जनतेसाठी
 राखी बांधण्याची आस मनगटावर
 त्याग बहुमोल खाकी साठी

भावनेची राखी बांधते
 रेशम धागे आशेचे
भावाची यशोगाथा शिखरे
सौख्य लाभावे आशिष बहिणीचे

राखी सदैव असे प्रतीक्षेत 
भिरभिरते नजर वाटेवर
अंत,वा खंत नात्याची
का आस जाईल ही सरणावर

*अनिता देशमुख*
*नांदुरा(बुलढाणा)*
*हमू.--कल्याण*
*9372319622*

    Post Views:  214


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व