भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी बळीराम सिरस्कार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
30 Nov 2022, 7:41 PM
अकोला : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी अकोला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य ओबीसी समाजासाठी सदैव संघर्ष नेतृत्व बळीराम सिरस्कार यांची यांची निवड ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केली आहे.
माजी आमदार बळीराम सिरस्कार अकोला बुलढाणा वाशिम अमरावती जिल्ह्यात ओबीसी समाजासाठी सदैव तत्पर राहणारे नेतृत्व असून त्यांच्या कार्याची दखल प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी घेऊन त्यांच्याकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
ओबीसी समाजामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामाचा शत प्रतिशत विस्तार करण्याच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करीत असून केंद्रात ओबीसी आयोगाची निवड करून त्याची जबाबदारी विदर्भातील माजी गृहराज्यमंत्री व माजी खासदार हंसराज अहिर याचा सोपविली आहे आता पश्चिम विदर्भात संघटनात्मक बाबीची जबाबदारी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्याकडे दिली आहे सिरस्कार यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडून पक्षाचा विस्तार करू असा विश्वास व्यक्त केला आहे खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल , आमदार राजेंद्र पाटणी आमदार आकाश फुंडकर, माजी महापौर अर्चना मसने, राजेंद्र गिरी रवी गावंडे कुसुम भगत सचिन देशमुख माधव मानकर तेजराव थोरात किशोर पाटील जयश्री फुंडकर , मोनिकाताई गावंडे, संजय जीरापुरे, हिरासिंग राठोड केशव ताथोड रमेश आप्पा खोबरे,सजयगोडफोडे आदींनी अभिनंदन केले आहे
Post Views: 233