शर्मिला ठाकरेंच्या त्या विधानानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Aug 2022, 8:57 AM
   

मुंबई : शिवसेनेने साद घातली तर येऊदेत असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्याचबरोबर उद्या राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिली. शर्मिला ठाकरेंच्या विधानानंतर उद्याच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून राज्यातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ते उद्या पुन्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला असून या शिवसेनेने साद घातली तर ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज ठाकरे उद्या पुन्हा आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात काही बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

    Post Views:  247


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व