अकोला अनैतिक मानवी वाहतूक पोलीस कक्षाकडून जुण्या शहरातील गुन्ह्याचा शोध एकून ५६ प्रकरणे उघडकीस
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Aug 2022, 1:56 PM
अकोला : अकोला पोलिस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून जुणे शहर पोलिस स्टेशनच्या क्षेत्रातील दोन वर्षांपासून दाखल अपराध क्र.५६/२० मधील प्रकरणाचा तपास करण्यात आला. यामधील पिडीत महिलेचा पुणे,नाशिक, मुंबई येथे शोध घेण्यात आला.त्यानंतर नातेवाईकांना विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीतून ती स्वतः उपस्थित झाली.तिला पुढील कार्यवाहीसाठी जुणे शहर पोलिस स्टेशनकडे रितसर सोपवण्यात आले.
पोलिस अधिक्षक जी.श्रीधर व पोलिस अधिक्षिका मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली महिला व बाल अत्याचारामध्ये भादवी कलम ३६३ व ३६६(अ) मधील जुलै २०२२ अखेर ३४ गुन्हे व २२ हरविल्याच्या तक्रारीसह एकून ५६ प्रकरणे अनैतिक मानवी वाहतूक पोलिस कक्षाने उघडकीस आणली आहेत. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर आणि मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय खंदाडे,सपोनि महेश गावंडे, पो उपनिरीक्षक विजय खर्चे,सुकेशनी जमधाडे,पोहेकॉ सुरज मंगरूळकर पोना आशिष अघडते,मपोकॉ, पूनम बचे,करिष्मा गावंडे,यांनी ही कारवाई केली आहे.अशा गुन्ह्यांचे तपासात पिडीत मुली आणि आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी पोलीस विभागाचा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष तत्परतेने तपासात सक्रिय असते.
Post Views: 249