अकोला युवती व नांदेडच्या अक्षय भालेराव प्रकरणाच्या कडक चौकशीची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मागणी


 संजय देशमुख  10 Jun 2023, 10:33 AM
   

अकोला ... मुंबईतील वसतीगृह चौकीदाराच्या अत्त्याचाराला बळी पडून हत्त्या झालेली अकोल्यातील पत्रकार कन्या आणि आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून पूर्ववैमनस्यातून बळी गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या दोन्हीही हत्त्याप्रकरणाची नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी करण्यात यावी व आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहण्याची कार्यवाही व्हावी.अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोल्यातील समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री या.देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडे केली आहे.

          अकोला येथील युवती ही एका पत्रकारांची कन्या आहे. चौकीदारावर संशय असल्याची तिची तक्रार असल्यावरही वस्तीगृह व्यवस्थापनाने तिची दखल न घेतल्याने तिचे आयुष्य हिरावले गेले.त्याचप्रमाणे अक्षय भालेराव या युवकाची झालेली हत्त्या ही सुध्दा सामाजिक सद्भावाला तडा पोहचविणारी आहे.अशा प्रकरणाची नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी होऊन,कोणतेही कच्चे दुवे सुटणार नाहीत अशाप्रकारे खटले दाखल होऊन आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा क्रूर गुन्ह्याची तिव्र गुन्ह्याची तीव्रता कमी होणार नाही.म्हणून याबाबत योग्य त्या कारवाईच्या सुचना पोलिसखात्याला द्याव्यात अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    Post Views:  139


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व