डॉ.रविंद्र भोळे आरोग्यसेवा केंद्र येथे पल्स पोलिओ लसीकरण


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Feb 2022, 6:45 PM
   

उरुळीकांचन-पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान ,महाराष्ट्र आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद व प्राइमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन यांच्या  सहकार्याने लसीकरण करण्यात आले.ह्या लसीकरणाचा शुभारंभ उरुळीकांचन ग्रामपंचायत सदस्या स्वप्नीशा आदित्य कांचन ह्यांचे शुभ हस्ते झाला .ह्या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ,शिवानी म्हस्के सी एम ओ ,मीरा लींबोने, अंगणवाडी सेविका,मुक्ता डोके व अंगणवाडी मदतनिस  उपस्थित होते. यावेळी  २२० बालकांना लसी देण्यात आल्या .ह्या मोहिमेला डॉ सुचिता कदम मुख्य वैद्यकिय अधिकारी ,डॉ संदीप सोनवणे वैद्यकीय अधिकारी, प्राइमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन ह्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.डॉ रविंद्र भोळे यांनी या लसीकरणासोबतच गेली तिस वर्षापासून आरोग्य विविध योजना राबविण्यसाठी समर्पित भावनेने कार्य केलेले आहे.

    Post Views:  241


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व