युवा व-हाडी लेखक सु.पुं.अढाऊकर यांची पहिल्या वैदर्भीय युवाविष्कार साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 May 2022, 5:58 PM
अमरावती : सुप्रसिद्ध युवा वऱ्हाडी साहित्यिक श्री सु.पुं.अढाऊकर यांची तरुणाई फाऊंडेशन द्वारा आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्याने आयोजित पहिल्या वैदर्भीय युवा कलाविष्कार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.संमेलनाचे स्वागताध्यक्ष पत्रकार शंकर जोगी हे असून उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध वक्ते आ.अमोल मिटकरी हे उपस्थित राहणार आहे.शनिवार 28 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता कृषीमहाविद्यालयाच्या ठाकरे सभागृहात सदर संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध युवा वऱ्हाडी लेखक व गीतकार म्हणून सर्वदूर परिचित असलेले सु.पुं.अढाऊकर यांची साहित्य संपदा खूप मोठी असून वऱ्हाडी बोलीभाषेतील साहित्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे."चूल" "भूक" "भाकर" हे कवितासंग्रह "धोंडीधोंडी पाणी दे" हा दीर्घ काव्यसंग्रह, "वऱ्हाडीच्या कथा" व "मुंबईच्या गोष्टी" हे कथासंग्रह तर "शियान" ही कादंबरी प्रसिद्ध आहे.याशिवाय "गाडगेबाबांच्या कविता" हा संपादित काव्यसंग्रह ही विपुल आणि वऱ्हाडीतील अस्सल साहित्य संपदा त्यांचे नावे असून दिडशेच्यावर साहित्य पुरस्कार आणि चोवीस हजार कवितांचे लेखन हा साहित्यातील मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे.
अकोला येथे होऊ घातलेल्या व तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष व पत्रकार श्री संदीप देशमुख यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात गझल मुशायरा,कविसंमेलन,परिसंवाद,पुरस्कार सोहळा,अशा विविध आणि भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.या संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री सु.पुं.अढाऊकर यांचेवर संपूर्ण साहित्य क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 183