दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, पुणे विभागाची प्रादेशिक सल्लागार समितीची बैठक संपन्न


बोर्डाचे कार्य कामगार वर्गांपर्यंत पोहोचविण्याचा सर्वातुमते निर्णय
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  26 Oct 2026, 3:48 PM
   

पुणे - 
         केंद्रिय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक संचालनालय पुणे यांच्यावतीने दिनांक 23 ऑक्टोबर 2026 रोजी, प्रादेशिक सल्लागार समितीची बैठक नूतन अध्यक्ष नितीन केंजळे व पुणे तसेच गोवा विभागाच्या प्रमुख अरुणा वाघ मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 
         यावेळी पुणे विभाग अंतर्गत आठ जिल्ह्यातील पात्र कामगारांना विविध योजनांद्वारे व उपक्रमांद्वारे लाभ मिळणेकामी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणेबाबत सकारात्मक चर्चा करणेत आल्या.
         मुख्यत्वे करून या कार्यालयाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगार, शेतमजूर कामगार, अल्पभूधारक, साखर कारखाने तसेच महिला उपसा कामगार अशा विविध क्षेत्रातील कामगारांसाठी विविध उपक्रम तसेच प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून, संबंधित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते.
         यावेळी कोल्हापूर मधील बंद केलेले कार्यालय पुर्ववत सुरु करणेबाबत वरीष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करणेचे निश्चीत करण्यात आले तसेच कोल्हापूर येथे कार्यालय सुरू करणेसाठी जिल्हा प्रशासनाने जागेसह शेंडा पार्क येथील नवीन इमारतीमध्ये कार्यालय होणेकामी सकारात्मकता दर्शविली असलेचे सुरेश केसरकर यांनी सांगितले.
त्याचबरोबर पुणे येथील कामगार विभागाच्या जागेबाबतही अर्जुन चव्हाण यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणेचे ठरविणेत आले.
         प्रशासनाच्यावतीने पुणे विभागाच्या प्रादेशिक संचालिका अरुणा वाघ यांनी आर्थिक वर्ष सन 2026 - 27 चे टार्गेट आणि अचिव्हमेंट सर्वांना अवगत करून या वर्षात झालेले कार्यक्रम, आयोजनासाठी आलेल्या अडचणी व समस्या यावर उपाययोजनां बाबत चर्चा झाली.
         यापुढील काळात सर्वच कार्यकारीणीने तसेच श्रमिक मित्रांच्या सहकार्याने पुणे विभागात बोर्डाचे कामगारभिमुख कार्य वाढविण्यावर भर देणेबाबत चर्चा करणेत आली.
         सदर बैठकीत बोर्डाच्या नवीन नियमावलीबाबत समाधान व्यक्त करीत, श्रमिक मित्रांच्या मानधनात वाढ करणे, यापूर्वी चालू असलेल्या पण सध्या बंद करणेत योजना पूर्ववत सुरू करणे, रिक्त जागांवर नवीन भरती अशा अनेक गोष्टींना अनुसरून वरीष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करणेचे ठरविणेत आले.
         बैठकीच्या सुरुवातीला विभागीय अधिकारी अरुणा वाघ यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व रोपटे देऊन स्वागत केले.
        सदर बैठकीला बोर्डाचे नूतन अध्यक्ष तथा पुणे महानगर पालिकेचे मुख्य कामगार अधिकारी - नितीन केंजळे, मनपाचे समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी - रामदास चव्हाण, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष - अर्जुन चव्हाण, हिंद मजदूर सभेचे सचिव - प्रकाश शिंदे, राज्य गुणवंत कामगार संघटनेचे अध्यक्ष - सुरेश केसरकर, कोल्हापूर जिल्हा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष - सर्जेराव हळदकर, एम.ई.एस युनियनचे सचिव - सोमलिंग येळवंते, लघु उद्योग संघटना महासंघाचे कार्यकारी सदस्य - अरविंद शिराळकर, युनिकपाथ ॲग्रो टुरिझमचे संचालक - दत्तात्रय शेळके आदी. मान्यवर व कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
         बैठकीच्या शेवटच्या सत्रात अल्पोपहारानंतर श्रीमती अरुणा वाघ यांनी आभार मानले. त्यानंतर बैठकीचा समारोप करणेत आला.

    Post Views:  10


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व