श्रीगोंदा- कुकडी पाटबंधारे विभाग श्रीगोंदा येथून हाफिज भाई शेख हे नुकतेच ३१ डिसेंबर रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत . त्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता.भंडारदरा येथे तीस वर्ष,श्रीगोंदा येथे पाच वर्ष ट्रेसर या पदावर त्यांनी पस्तीस वर्षे काम केले.
ते मूळचे श्रीगोंदा येथील रहिवाशी आहेत.सर्वांसाठी मदतीची भावना आणि मधूर संभाषण शैली यामुळे त्यांच्याबद्दल नागरीकांचे समाधान होते. माझ्याकडे शासकीय कामासाठी आलेला व्यक्ती कधी निराश झाला नाही, असे सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले. मी जरी सरकारी अधिकारी असलो तरी मी जनतेचा नोकर म्हणूनच काम केलेल आहे.निष्ठावंत राहून मी माझी नोकरी आणि तोंड देऊन नव्हें तर तोंड सांभाळूनच काम केले आहे. माझे सहकारी सुद्धा याप्रमाणे पुढील सेवा देतील. या कार्यक्रमात सेवानिवृत्त होण्याबद्दल शुभेच्छा देताना सर्व श्रीगोंदा येथील काही मित्र डाॅ. राजेंद्र सिदनकर,श्री उद्धव गायकवाड सर,श्री डाॅ बबन चव्हाण,श्री राजु सिदनकर,श्री. सतीश भालेराव ॲडव्हकेट. शहाजी लोखंडे व अनेक जण उपस्थित होते.
Post Views: 203