अनिल देशमुख प्रकरणातील माहिती नुसती ऐकिव!
परमबीर सिंह यांच्या वकिलाचा खुलासा
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात फरारी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे अनिल देशमुख यांच्यावरील गुन्ह्याबाबत जी माहिती आहे ती सगळी ऐकीव आहे. त्यामुळे त्यांना साक्षीदार म्हणून आयोगासमोर हजार करण्यात काहीच अर्थ नाही. असा मोठा खुलासा आज परमवीर यांच्या वकिलाने चौकशी आयोगासमोर केल्याने अनिल देशमुख प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागली आहे.
अनिल देशमुख यांच्या वरील आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने जो चौकशी आयोग नेमला आहे. त्याच्या समोर आज परमवीर सिंग यांचे वकील बाली यांनी सांगितले की परमबीर सिंग यांच्याकडे असलेली सर्व माहिती एकीव आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारे आहेत त्यांच्याकडे थेट अशी कोणतीही माहिती नाही त्यांना इतरांनी जे सांगितले तेच त्यांनी सांगितले .त्यामुळे त्यांना साक्षीदार म्हणून आयोगासमोर उभे करण्यात काहीच अर्थ नाही. परमबीर सिंग यांच्या वकिलांच्या या खुलाशामुळे मुले खंडणी प्रकरणातून अनिल देशमुख यांना एक प्रकारे क्लीन चीट मिळाली आहे. दरम्यान परमवीर सिंग यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले असले तरी तरी अद्याप त्यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या घरावर 30 दिवसात आयोगासमोर साक्षीसाठी येण्याची नोटीस लावण्यात आलेली आहे . परमवीर सिंग भारतातच आहेत असे सांगण्यात येत असले तरी जोवर ते हजर होत नाहीत तोवर काहीच स्पष्ट होणार नाही असेच वाटत असताना आज त्यांच्या वकिलाने चौकशी आयोगाच्या समोर जो खुलासा केला आहे . त्या खुलाशामुळे अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे निराधार आहेत आणि त्याबाबत परमबीर सिंग यांच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट झाल्याने 100 कोटी खंडणीच्या आरोपातून एक प्रकारे देशमुख यांना क्लीनचिट
Post Views: 174