मराठी भाषेचा, विद्यार्थी जीवनाचा शिल्पकार म्हणजे शिक्षक


शिक्षक ज्ञानरुपी पंढरी अवतरली धरतीवरी
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Sep 2022, 5:37 PM
   

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थी असतो प्रथम गुरु आई जी जन्म देते पण आयुष्याला योग्य दिशा योग्य वळण लावणारा खरा गुरु म्हणजे शिक्षक असतो.
    बालवयापासून आपल्याला संस्कार अक्षरज्ञान अक्षर ओळख शिकवण्याची धडे जो गिरवतो तो शिक्षकच आपल्या हातात लेखणी देऊन स्वतः अक्षर गिरवण्याची ज्ञान मार्गदर्शक शिक्षकच करतो. शिक्षकांच्या शिकवण्यामुळे आपण पहिले अक्षर वहीवर पाटीवर गिरवत असतो.
आपल्या नावाची खरी ओळख अक्षराने शिक्षकच आपल्याला करून देतो. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वास नेणारा खरा आधार म्हणजे शिक्षक शिक्षक प्रश्न नाही तर उत्तर आहे.  शिक्षक आपण आपल्या मनातील, आयुष्यातील पाठ्यपुस्तकातील असो किंवा कुठलेही प्रश्न असो ते आपण शिक्षकाला विचारतो त्याचे उत्तर आपल्याला शिक्षकाकडून मिळते. आपल्याला प्रश्न विचारताना शिक्षकासमोर भय वाटत नाही. शिक्षक हा आयुष्याचा विद्यार्थी माणसाच्या आयुष्यातला एक ज्ञानाचा वटपृष्ठ असतो ज्याच्या प्रत्येक ध्यानाच्या फांदीला शब्दांची पाने फुटलेली असतात. ज्ञानरूपी वटवृक्षाच्या छायेखाली प्रत्येक मनुष्य हा घडत जातो.तो शिकत असतो. शिक्षकाला राग नसतो, शिक्षक राग नाही माघार आहे शिक्षक प्रश्न नाही उत्तर आहे. शिक्षक भय नाही आधार आहे. शिक्षक क्रोध नाही वात्सल्य आहे.
 शिक्षक वार नाही क्षमा आहे.
. शिक्षक घाव नाही शितलतेचा मलम आहे. शिक्षक धन नाही तर कुबेराचा साठा आहे शिक्षक जात नाही तर पत आहे. शिक्षक बालमानाचा कुंभार आहे जो विद्यार्थी जीवनाला आकार देऊन साकार करत असतो, जिथे ध्येय तिथे शिक्षक कृतीकार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक व्यक्ती बालवयापासून घडत जातो. अज्ञानाच्या रखरखत्या वाळवंटातून ज्ञानरूपी अमृताचा पाझर फोडून एक व्यक्ती शिक्षक घडवत असतो.  जगाचा आधारस्तंभ,आजच्या  नवयुवकाचा आधारस्तंभ आणि विद्यार्थी तसेच जो घडवतो तो फक्त आणि फक्त शिक्षकांना कडे रंग जीवनाचे भरतो.  आशेने शिक्षकांच्या प्रत्येक रंगात जीवनाची भूमिका प्रत्येक, स्फूर्ती दाखवण्याची, नवरंग ज्ञानाचे इंद्रधन असतात. त्याच्या विचारांच्या तेजाने तो विद्यार्थी दशेचे जीवनातील रंग भरवत असतो , त्याच्या या ज्ञान आगाराने क्षणाक्षणाला विचारधारेने विद्यार्थी हा घडत असतो.  ज्ञानाच्या अनंताने प्रत्येक विद्यार्थी जीवन साकारले जाते, कधी छडीचा मार तर, कधी प्रेमाच्या आशेच्या ह्या  ज्ञानमय धारा ह्या वाहत असतात तर कधी कौतुकाची पाठीवर असणारी थाप तर कधी मुलांच्या भवितव्यासाठी विद्यार्थ्यांवर रागावून अधिकाराने त्याला सुधारण्यासाठी दिलेला शब्दाचा मार विद्यार्थ्याला प्रत्येक क्षणी पूर्णत्वास नेण्याचे कार्य हे फक्त शिक्षक करतात शिक्षक हा धरेवर लाभलेला ज्ञानमय पंढरी आहे ज्याच्या लेखणीच्या बुद्धीच्या ताकदीने तो या विद्यार्थ्याचे जीवन विद्यार्थी जीवनाची जीवनाचे ज्ञानाचे पंढरपूर आणि ती ह्या नंबर मूर्ती घडवत असतो त्याच्या ज्ञानाचे बालपणापासून कुंभाराप्रमाणे ऊन वारा पाऊस सर्व ऋतून प्रमाणे शितलतेने ज्ञानाची मायेचे आवरण घालत एक प्रकल्प माणूस तयार करत असतो मराठ्यांचा मराठी शाळेचा मराठी भाषेचा वापर हा एक शिक्षणा शिक्षकच करणार आहे ओसाड पडलेल्या जीवनाला मनावर तो आपल्या ज्ञानाचे बीज रोग त्या ज्ञानाने हिरवीगार वल्लरी तयार करतो विद्यार्थ्यांचे प्रगती यश बघण्यातच त्याचे जीवन असते खरे सुख दडलेले असते निस्वार्थी भाव हा फक्त शिक्षकांकडे असतो परंतु आजकालच्या जीवनामध्ये त्यालाही उदरनिर्वासाठी आर्थिक सहाय्य आवश्यक असते प्रत्येक घरात यशाचा दीप लावण्याचे त्याचे कार्य हा शिक्षक करत असतो. 
   शिक्षक हे एक दिव्याची वाती प्रमाणे आहे. आणि विद्यार्थी हा एक दीप आहे ज्याची वाट शिक्षकाच्या कष्टाने शिक्षकाच्या ज्ञानाने ज्योतीने सतत तेवत असते सामर्थ्य हे फक्त गुरु म्हणजे शिक्षक शिक्षकातच ते सामर्थ असते.  विद्यार्थी हे राष्ट्राचे, उद्याचे  भविष्य राष्ट्राचे भविष्य हे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी घडवण्याची ताकत बुद्धी, कार्य हे शिक्षक करत असतात .जीवनाची भूमिका दाखवून विविध परिस्थितीत मात कशी करावी याचे ज्ञान देण्याची मदत ही शिक्षक करत असतात.
 शिक्षक प्रेरणादायी मार्गदर्शक आहेत, जी जीवनाचा आधारस्तंभ आहे प्रकाशाची वाट दाखवून एक उत्कृष्ट माणूस एक उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याची कला फक्त नि फक्त शिक्षकात असते प्रकरतेचा सूर्य ज्ञानाच्या किरणांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आपल्या ज्ञानाचे तेज पसरवण्याचे कार्य शिक्षक करत असतात शिक्षक शास्त्रज्ञ सर्वकाही बनवण्याची ध्येय ही शिक्षकाला असते आपल्या प्रकल्प त्याच्या वैचारिक बुद्धीने शिक्षक जीवनाच्या उद्दिष्टांच्या वाटेवर ज्ञानदानाचे कार्य जीवनाची भूमिका दाखवण्याचे काम शिक्षक करत असतात पण आज शिक्षकांची दशा ही दयनी झाली आहे सरकारी शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहेत खाजगीकरणाने ऊत आणलेला आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचे मुलं उच्च शिक्षण घेण्यासाठी वंचित ठरतात ,सर्व लोकांना पदवीधर बनता येत नाही, आर्थिकतेचा प्रश्न हा बिकट होत चाललेला आहे.
 त्यामुळे विद्यार्थ्याला मनासारखे शिक्षण मनासारखी पदवी घेता येत नाही. आज असंख्य, करोडो विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित झालेले आहेत. इतर देशामध्ये 12 वी पर्यंत मुलांना फी नसते मोफत शिक्षण  दिले जाते त्यामुळे तिथे आर्थिक बेरोजगारी दिसून येत नाही.
 आज खाजगीकरणाने शिकवणीने अमाप फी घेऊन क्लासेस चालवले जातात. त्या सर्वसामान्यांच्या मुलांना पुढे जाण्यास बाधा ठरत आहे. सरकारने जर खाजगीकरण बंद करून , सरकारी शाळेला  उत्कृष्ट दर्जा दिला उत्कृष्ट शिक्षक तिथे नेमले गेले, उत्कृष्ट सोयी जर दिल्या तर आज मुलं शिक्षण घेतल्यापासून वंचित राहणार नाही .
आज देशांमध्ये जी बेरोजगारी आहे ती विद्यार्थी न शिकण्यामुळे!! विद्यार्थ्यांचा विकास न झाल्यामुळे आहे. सर्वच मुलांना योग्य ते शिक्षण मिळत नसल्यामुळे इच्छा असूनही आर्थिक ते मुळे त्यांच्या इच्छा माराव्या लागतात. क्लासेस नसल्यामुळे मुलांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत.
 आज शिक्षणाची दशा ही फार दयनीय झालेली आहे ,खालावली आहे आणि ही दशा सुरळीत करण्याचे हे मार्गदर्शन फक्त शिक्षक करू शकतो.  शिक्षकांनी जर वारंवार सरकारला शाळेला जर ह्या मागण्या केल्या किंवा याचा जर मार्ग दाखवून योग्य ते उपाय त्यावर उपाय योजना शिक्षकांनी केली  तर नक्कीच देशाच्या, समाजाच्या आणि सुशिक्षितांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा सुटू शकतो. शिक्षणातही आज फार मोठा भ्रष्टाचार होत आहे. हे थांबवण्याचे कार्य फक्त शिक्षक करू शकतात त्यांची वैचारिकता त्यांची मानसिकता ही फक्त असायला हवी. आज मराठी भाषा कमी प्रमाणात दिसत आहे.
 शिक्षणाच्या प्रसार, प्रचारामध्ये हा फक्त इंग्रजी भाषेमध्ये जास्त कर चालेल आहे शिक्षण देण्यासाठी मराठी भाषा अपयशी ठरत आहे. विज्ञानाच्या आज चमक धमक ने इंग्रजी भाषेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जातो. विज्ञानाच्या प्रगतीने मराठीला दुय्यम दर्जाला मिळाला जात आहे, यावर शिक्षकांनी व्यक्त होऊन त्यावर तोडगा काढायला पुढे आले पाहिजे.  मराठी महाराष्ट्राची शान महाराष्ट्र, महाराष्ट्राची भाषा आपली शिक्षणाची ही मराठी असायला हवी शिक्षणाची दशा ही इंग्रजी माध्यमांकडे न जाता ही मराठी माध्यमांकडे जास्त गेली तर देशाचा  विकास नक्कीच होऊ शकतो.
   आज देशाचा कारभार, देशाचे आर्थिक व्यवहार आणि देशाचा रोजगार हा बाल रोजगार हा नव तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच सुटू शकेल यांना फाटा फोडण्याचे कार्य,सामर्थ्य फक्त  शिक्षकांमध्ये आहे. याचे दुष्परिणाम हे आज सर्वसामान्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, बेरोजगारीला भोगावे लागत  आहे. आणि याच्या मार्गदर्शनाचा तोडगा काढण्याचे प्रथम कर्तव्य हे शिक्षकांवर अवलंबून आहे. हे शिक्षकांनी जर सरकारला शिक्षण खात्याला जर हे व्यवस्थित समजावून सांगितले तर नक्कीच यावर काहीतरी उपाय होऊ शकतात. एक ज्ञानरूपी मंदिराचाकर्ता धरता हा शिक्षक आहे. आज समाजात मराठी भाषेला, विद्यार्थ्यांना प्रगती करण्याला.मराठी भाषाच कामात पडणार आहे. मराठीच उपयोगात येणार आहे, आणि या मराठी मुळे देशाची प्रगती नक्कीच होणार आहे.
 अनिता देशमुख
नांदुरा(बुलढाणा)
हमू.--कल्याण

    Post Views:  874


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व