टपाल विभागाच्यावतीने पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी नोंदणी मोहीम सुरू
मुंबई:--टपाल विभागाने पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी नोंदणी मोहीम सुरू केली आहे. भारत सरकारच्या या भव्य उपक्रमामुळे छतावर सौर पॅनेल बसविण्यासाठी भरघोस अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे देशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळेल. या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी आता पोस्टमन आणि टपाल कर्मचारी मदत करणार आहेत. वीज बिलात मोठी बचत आणि स्वच्छ तसेच किफायतशीर ऊर्जा भविष्यासाठी सर्व व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.अधिक माहितीसाठी, https://pmsuryaghar.gov.in/ ला भेट द्यावी अथवा किंवा आपल्या विभागातील पोस्टमनशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाला भेट द्यावी.
Post Views: 440