सुयोग प्रतिष्ठान नानिवली मध्ये सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा वृक्षरोपण व वृक्ष भेट कार्यक्रम संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Aug 2023, 1:48 PM
पालघर - (संतोष घरत)- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे ब्रीद वाक्य लक्षात घेत झाडे जगवा झाडे वाचवा ह्याची जाणीव ठेवत आज् सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पूर्व विभाग किराट गटातर्फे सुयोग प्रतिष्ठान नानिवली येथे आज भव्य असा वृक्ष रोपण व वृक्ष भेट कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाकरिता किराट गावातील सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे आद्य संस्थापक सन्माननीय जगन्नाथ पावडे उपस्थित होते.
सुयोग प्रतिष्ठान नानिवली गावामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम भव्य दिव्य अशा साई मंदिरामध्ये साईबाबांचे दर्शन घेऊन तेथूनच वृक्षदिंडी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे चिटणीस प्रशांत सातवी यांनी केले.
सुयोग प्रतिष्ठान नानिवली येथे आज सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग किराट गटातर्फे वृक्षदाते मा.श्री. अनंत जीवन पाटील, नावझे यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. कल्पेश मोहन पवार (अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ) तर ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक नानिवली गावचे सुपुत्र, (अध्यक्ष -रोटरी क्लब ऑफ विरार. प्रोफेसर-विवा कॉलेज विरार )माननीय श्री. महेंद्र लक्ष्मण घरत, विशेष अतिथी कमलाकर पाटीलसर बोरशेती(आदर्श शिक्षक),किरण पद्माकर पाटील (पंचायत समिती पालघर सदस्य.) प्रमुख पाहुणे श्री .संतोष ठाकूर,( सामाजिक कार्यकर्ते)ॲड . श्री. उमेश घरत(अध्यक्ष- सुयोग प्रतिष्ठाण नानिवली) आर्टिस्ट श्री. स्वप्निल घरत हया मान्यवरा बरोबरच मंडळाचे विश्वस्त भालचंद्र पाटील, सुनील भाऊ शेलार, चंद्रशेखर नाईक, समवेत मंडळाचे पदाधिकारी सुनील पाटील , वैभव पाटील, प्रशांत सातवी, अमित पाटील, भूषण सातवी मनोज पाटील, जतीन भोईर , धीरज पाटील, ह्याच्या उपस्थितीत झाला.
सुयोग प्रतिष्ठान नानिवली या गावाने अनेक सामाजिक किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये कमी लोकसंख्या असून सुद्धा श्रमदान हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत , वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला त्या अनुषंगाने त्यांना सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष कल्पेश पवार ह्यांनी ह्या कार्यक्रमा वेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा मध्ये अनेक मान्यवराने आपल्या भाषणातून झाडांचे महत्त्व काय व त्यापासून होणारे फायदे कोणते आहेत हे सर्वांना समजावून सांगितले. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व ग्रामस्थांना वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
नानिवली गावचे सुपुत्र महेंद्र घरत, विवा कॉलेज चे प्रोफेसर असुन जेव्हा ते रोटरी क्लब ऑफ विरार चे अध्यक्ष असताना नानिवली येथे जिल्हा परिषद शाळा करिता ७.५० लक्ष निधी मंजूर करून शाळेचे काम पूर्ण केले व एवढेच करूनच थांबता त्याने आज आपल्या स्वखर्चाने त्याच शाळेकरिता संगणक संच मोफत भेट दिला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकारी व पाहुणे उपस्थित राहून हा कार्यक्रम आनंदाच्या वातावरणात पार पाडण्यास सहकार्य केले. नानिवली गावातील महिला , पुरुष वर्ग, व युवक वर्गाने खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.
Post Views: 249