कुणबी समाज बहुउद्देशिय मंडळ, मोठी उमरी, अकोला र.नं. ३२५ चे अध्यक्षपदी श्री गजानन थोरात


उपाध्यक्षपदी श्री विठ्ठल महोकार व सचिव पदी श्री देविदास पोटे यांची अविरोध निवड
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 May 2022, 5:00 PM
   

कुणबी समाज बहउद्देशीय मंडळ, मोठी उमरी, र.नं. ३२५ चे सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २६/४/२०२२ रोजी शिव हार्डवेअर येथे संपन्न झाली त्या सभेमध्ये सर्वानुमते प्रथम अध्यक्ष श्री डॉ. दिनकरराव चांदणे यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थती समाज बांधवांना एकत्रीत करुन मंडळची यशस्वी वाटचाल केली. त्याच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष श्री गजाननराव थोरात यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष म्हणुन श्री विठ्ठलराव मोहोकार, व सचिव म्हणुन श्री देविदासजी पोटे, सहसचिव श्री मनिष गुजरकर या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच संचालक म्हणुन श्री डॉ. दिनकरराव चांदणे, श्री पुरुषोत्तमजी धोत्रे, श्री विठ्ठलराव लोथे, श्री प्रमोद भाऊ लांडगे, श्री बंडुभाऊ भारसाकळे, श्री भैय्या भराटे, श्री दहिभात सर, तेल्हारकर साहेब, मनिष नळे, नितीन पाचकोर, निखील थारकर, सौ. वाकडे ताई, सौ. जयश्री गावंडे ताई, सौ. पद्मीनी ताई गावंडे, सौ. जवंजाळ ताई यांची नियुक्ती करण्यात आली.

अकोला जिल्ह्यात कुणबी समाजाचे स्वमालकीच्या ७००० स्क्वेअर फुट असलेला (धोत्रे परिवाराने दान दिलेला) समाजाचा ऐममेव भुखंड आहे. तसेच समाजाचे सुमारे १००००० रु. किमतीचे बिछायतचे समान समाज बांधवांना अल्प दरात देण्यात येते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संत शिरोमणी जगद्गुरु मंदिर लोक सहभागातुन बांधण्याचा संकल्प केला आहे. तसेच त्याकरीता मंदिर व्यवस्था देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे.


    Post Views:  222


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व