जास्तं मुले होऊ देण्यासाठी चीनमध्ये महिलांना आर्थिक सवलती जाहीर
घर आणि कर्जासह रोख रकमेचे सुद्धा आमिष
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
19 Jul 2022, 9:28 AM
बीजिंग ः घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत पडलेल्या चीन सरकारने जास्त मुले होऊ देण्यासाठी महिलांना विविध सवलती देऊ केल्या आहेत. सर्वाधिक लोकसंख्येचा हा देश आता लोकसंख्या घटीला सामोरा जातो आहे.
भविष्यात कामकरी वर्ग कमी पडण्याच्या भीतीमुळे जास्त मुले जन्माला घालण्यासाठी महिलांना सवलती दिल्या जात आहेत. त्यात कर आणि घरांच्या कर्जात सवलती, शैक्षणिक फायदे आणि रोख रकमेचाही समावेश आहे. यंदाच्या जानेवारीत चीनच्या मुख्य भूमीवरील लोकसंख्या 141 कोटी 30 लाख होती आणि 2021 मध्ये नवजात बालकांची संख्या 10 कोटी 62 लाखांनी घटली होती.
लोकसंख्या नियंत्रणासाठी पूर्वी चिनी कम्युनिस्ट पक्षाने ‘एक मूल’ या धोरणांतर्गत गर्भपात आणि नसबंदीचे धोरण कठोरपणाने राबविले होते आणि त्यामुळे लोकसंख्या घटत गेली. आता महिलांनी एकापेक्षा जासत आणि शक्यतो तीन मुलांना जन्म द्यावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. या सवलती फक्त विवाहित दाम्पत्यांसाठीच आहेत. लोकसंख्या वाढविण्याची इच्छा असली, तरी काणेाला मुले असावीत याचा निर्णय सरकारच करते. त्यात एकट्या महिला आणि अल्पसंख्याकांबाबत भेदभाव केला जात असल्याची टीका होत आहे. एकट्या पण गर्भवती असलेल्या महिलांना सार्वजनिक आरोग्यसुविधा, बाळंतपणाची रजा नाकारली जाते. गर्भवती असताना कामावरून काढून टाकले, तर अशा महिलांना कायद्याचे कोणतेही संरक्षण मिळत नाही.
प्रचंड लोकसंख्येचे दहा देश
1. चीन
2. भारत
3. अमेरिका
4. इंडोनेशिया
5. ब्राझील
6. पाकिस्तान
7. नाजेरिया
8. बांगलादेश
9. रशिया
10. मेक्सिको
Post Views: 316