सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्टॉलचे उद्धाटन


 संजय देशमुख  2022-05-01
   

अकोला दि.1(जिमाका)- सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी याकरीता झेंडा वंदनाच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहे. तसेच माहिती पत्रिकांचे वाटप व ग्राम सभांमधून योजनांच्या माहितीचे वाचन होणार आहे. या उपक्रमाचा लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका वाटप होणार आहे. तसेच जिल्हा व ग्रामीण भागात लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचन करण्यात येणार आहे.  हा उपक्रम अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश आहे

सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावण्यात आले आहे. तसेच माहितीपत्रिका वाटपही करण्यात येत आहे. हा उपक्रम समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

    Post Views:  246


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व