खेंडकर विद्यालयात प्रसत्ताक दिन व महिला पालकांसाठी हळदी कुंकू व आनंद मेळाव्याचे आयोजन उत्साहात


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Jan 2025, 10:07 AM
   

सरस्वती नगर जुना वाशिम नाका बायपास रोड अकोला येथील खेंडकर ज्ञानगंगेत 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध डॉक्टर अमोल रावणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ध्वजरोहनानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतीय नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. दरम्यान यावेळी वर्ग चौथी मधील विद्यार्थ्यांनी डंबेल्स, वर्ग पाचवी मधील विद्यार्थ्यांनी कवायत, वर्ग सहावी मधील विद्यार्थ्यांनी डंबेल्स आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम ड्रिल सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी  26 जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, कारण या दिवशी आपले संविधान भारत देशामधे लागू होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली. हा दिवस लोकशाहीचा आणि आपल्या वीर जवानांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशभर देशभक्तीचे वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन डॉक्टर अमोल रावणकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संखेने उपस्थीत होते. 
 सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध डॉक्टर अमोल रावणकर यांची उपस्थिती होती, तर विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर, स्व यमुनाबाई खेंडकर प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अल्केश खेंडकर यांची प्रार्थनीय उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष मृणाली खेंडकर आणि संस्थेच्या सहसचिव अस्मिता खेंडकर यांची उपस्थिती होती. दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये विविध प्रकारची ड्रिल्स सादर करण्यात आली, तर दुपारच्या सत्रामध्ये महिला पालकांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला. सोबतच यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याचे आयोजनसुध्दा केले होते. यामध्ये नर्सरी ते वर्ग दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातून खरी कमाई चे धडे घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाच्या नुसार पैसे गोळा करून विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावली होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यवहारिक जीवनाचा अनुभव घेऊन खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाचे संचालन उषा जगदाळे यांनी केले तर आभार प्रज्ञानंद थोरात यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक आशा हिवरकर, कांचन वानखडे, सुरेश सुरत्ने, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे,  प्रशांत काळे, अश्विनी सोळंके, अंजु मुंढे, मिना घाटोळे, यामीनी उपश्याम, शारदा पांडे, सुकेशनी ओहेकर, छाया इंगळे, वर्षा मते, स्वाती कापसे, रूपाली उन्हाळे, मिना घाटोळे व शिक्षकेत्तर कर्मचारी याचे सहकार्य होते.

    Post Views:  77


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व