सुवर्णा पब्लिकेशन बहुउद्देशिय संस्थेचा समाजसेवी उपक्रम
मेळघाटामध्ये आदिवासी मुला-मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 May 2022, 12:19 PM
अकोला : मेळघाटातील आदिवासी लहान मुलांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना क्रीकेटच्या टोप्या देण्यात आल्या, तसेच अनवाणी फिरत असलेल्या लहान मुलींना चप्पल तसेच वृद्धांसाठी उन्हापासून बचाव व्हावा म्हणून दुप्पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच स्मॉल अॅण्ड मेडीयम न्यूज पेपर संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संतोष धरमकर हे दरवर्षी आदिवासी बांधवांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करत असतात. याहीवर्षी त्यांनी मेळघाटामधील आदीवासी बहूल गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व गावात फिरून त्यांनी मुलींना, लहान मुलांना तसेच वृद्धांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले.
तेथील मुला-मुलींनी लगेच टोप्या घालून व चप्पल घालून आनंद व्यक्त केला, तसेच वृद्धांना दुप्पटे व कपडे दिले असता त्यांनी लगेच घालून आनंद व्यक्त केला व आभार देखिल व्यक्त केले. यावेळी त्यांचे सोबत शिवसेनेचे नेते प्रदीपभाऊ गुुरुखुद्दे, दत्ता ठाकरे, आबाराव आमले, संदीप मोरे, आरिफ खान, सचिन अहीर हे मान्यवर होते. त्यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. संतोष धरमकर यांच्या समाजसेवी कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
Post Views: 263