जिल्हा मराठी भाषा समितीवर ४ अशासकीय सदस्यांची नियुक्ती


 संजय देशमुख  05 Feb 2022, 12:02 PM
   

अकोला : महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार अकोला जिल्ह्यामध्ये मराठी भाषा समितीमध्ये अशासकीय सदस्यांची समिती गठीत करून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातून चार अशासकीय सदस्य या समितीवर नियुक्त करण्यात आले आहेत. मराठी भाषा, कला, प्रयोगनिष्ठ, कला, संस्कृती, साहित्य मधून अकोल्याचे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच हिवरखेड येथील मयूर लहाने यांचीही या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राजपत्रामध्ये दिलेल्या नियमानुसार संस्था, संघटना, चळवळी मधून बार्शीटाकळी येथील वऱ्हाडी साहित्य व बोली भाषा संवर्धन संस्थेचे श्याम ठक यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राजपत्रामध्ये दिलेल्या नियमानुसार संस्था-संघटना चळवळीमधून डॉ. विनय दांदळे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या चारही अशासकीय सदस्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीची असून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या पदावर रुजू राहणार आहेत.

    Post Views:  204


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख