अकोला ः अत्यंत कमी वयात अरॉबीक्स जिम्नॅस्टीक या क्रीडा प्रकारात सीबीएसई नॅशनलमध्ये सुवर्ण पदक पटकावून अनय राहुल तायडे या विद्यार्थ्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अनय हा प्रभात किड्स स्कूलचा 3 र्या वर्गाचा विद्यार्थी आहे.
बंगलोर येथे संपन्न झालेल्या सीबीएसईच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशभरातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये अनयने आपल्या खेळाची चमक दाखवून सर्व राज्यातील खेळाडूंना मागे सारत विजयश्री खेचून आणली. एवढ्या लहान वयात सीबीएसईचे राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदक मिळविणारा अकोल्यातील तो पहिलाच खेळाडू आहे. यापुर्वी देखील त्याने या क्रीडा प्रकारात अनेक पदके प्राप्त केली आहेत.
नांदुरा येथील तहसीलदार राहुल तायडे यांचा अनय मुलगा आहे. त्याला त्याचे क्रीडा मार्गदर्शक राहुल पहुरकर, आशिष बेलोकार यांचे मार्गदर्शन लाभले. नियमतीतपणे अकोल्यावरुन शेगावला दररोज जाऊन त्याने या खेळाचा सराव केला आहे. त्याच्या या द्वैदित्यमान यशाबद्दल संत गजानन महाराज जिम्नॅस्टिक अकॅडमीचे संचालक श्रीकांत पाटील, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 178
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay