बोईसरच्या चिन्मय विद्यालय व्यवस्थापनाविरूध्द शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडूनही निषेध..!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Apr 2022, 10:50 PM
   

*बोईसर* ( *संतोष घरत* ) 
कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यानची थकीत फि न भरलेल्या पाच वर्ष वयाच्या व त्या पुढील विद्यार्थ्यांना चक्क शाळेच्या ग्रंथालयात कोंडून ठेवण्याचा अमानविय संतापजनक प्रकार चिन्मय विद्यालयाच्या  व्यवस्थापनाने घडविला असून या प्रकाराने पालकवर्ग संतापला आहे.या अमानुष प्रकरणाचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडूनही निषेध करण्यात आला आहे.तब्बल तिन तास मुलांना कोंडून ठेऊन त्यांचा मानसिक छळ केल्यावरही येथील कर्मचाऱ्यांनी पालकांशीही हुज्जत घालून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे संतप्त पालकांनी सेवा,शिक्षण आणि मानवतेशी प्रतारणा करून पैशांसाठी मुलांशी अमानविय खेळ करणाऱ्या चिन्मय शाळेच्या  व्यवस्थापनाची तक्रार श्रीमती संगीता भागवत,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे केली आहे‌. यासंबधीचे निवेदन सौ.भावना विचारे,श्री.भावेश मोरे,सौ.वैशाली साधुलवाड यांनी दिले असून यावेळी त्यांचेसोबत पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते श्री निनाद घरत,श्री राजेश करवीर,श्री भूषण अधिकारी,पालक प्रतिनिधी श्री सुभाष शर्मा, सौ.जान्हवी पाटील,श्री यतिश पिंपळे उपस्थित होते.
यावेळी फी साठी व्यवस्थापनाने दिलेल्या अमानुष वागणूकीसोबतच शाळेने दिलेल्या शालेय पुस्तकांवर जास्तीत जास्त छापील विक्री मुल्ल्यांपेक्षा प्रत्येकी रू १५० पालकांकडून वसूल केल्याच्या व ईतर गैरप्रकारांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला असून याबाबतच संपूर्ण घटनाक्रम विषद केला आहे. संपूर्ण प्रकारची चौकशी करून नविन पालक व्यवस्थापन समिती नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली.फी साठी मुलांना वेठीस धरून पालकांना अपमानित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पैशासाठी हपालेल्या या व्यवस्थापन समितीचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पत्रकार श्री संतोष घरत व पत्रकार महासंघाच्या पालघर येथील पदाधिकाऱ्यांनी निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.

    Post Views:  1091


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व