विद्यापीठ हायस्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 Feb 2023, 6:26 PM
   

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल, पुणे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली . शिवाजी महाराजांबद्दल आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमातून शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देविदास वाबळे व मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोवाड्यातून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, गीते, व्याख्यान व नाटक सादर केले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व मावळे यांची वेशभूषा परिधान केली होती. शिवछत्रपतींच्या जीवन कार्यावर आधारित चित्रमय प्रदर्शन भरविण्यात आले. विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता जाधव तर आभार अरुण साबळे व सूत्रसंचालन प्रियंका मस्के व पल्लवी सावंत या विद्यार्थिनींनी केले. प्रमुख पाहुणे देविदास वाबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे,  शिक्षक प्रतिनिधी वैशाली सैंधाणे, संध्या आवेकर, विलास पारडे, मनोहर निकम, प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

    Post Views:  605


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व