प्रत्येकाला आपत्ती सुरक्षाचे प्रशिक्षण असणे काळाची गरज : प्रियदर्शनी पाटील, जिप सदस्य


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Mar 2022, 1:26 PM
   

अलिबाग : निसर्गाच्या बदला मूळे होणाऱ्या परिणाम मूळे आपल्या वर वेगवेगळ्या आपत्या येत असतात त्याला सामोरे कसे जायचे याचे शिक्षण असणे आपल्याला गरजेचे आहे आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष डॉ.किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत असे शिबिर आयोजित केले असून त्याच्या पहिल्या शिबीराची उद्घाटनाची संधी मला लाभली असून याचा आनंद होत असून ही माहिती आपल्या शेजाऱ्यांना सांगावी असे प्रियदर्शनी संजय पाटील यांनी आवाहन केले. सुरक्षा च्या छोट्या छोट्या बाबीकडे आपण लक्ष दिले पाहिजे असे त्यानी सांगितले.

व्यासपीठावर रायगडचा युवक फौंडेशन चे अध्यक्ष, रायगड भूषण जयपाल पाटील,सरपंच स्वाती सतीश पाटील,उपसरपंच प्रणिता, प्रल्हाद म्हात्रे,योग शिक्षक सुहास गानू,ग्रामसेवक निलेश गावंड उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रवजल झाले,वृक्ष कुंडी भेट देऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.  
प्रस्तावित ग्रामसेवक निलेश गावंड यांनी केले. सुरवातीला योगाबद्दल सुहास गानू यांनी माहिती व प्रात्यक्षिक दाखविले,तर आपत्ती तज्ञ जयपाल पाटील यांनी महिलांची स्वयंपाक घरातील गेस, वीज,गिझर,पाणी यांची व पोलीस याची सुरक्षा,अपघात महिलाना गरोदर प्रसंगी 108 चा मोफत वापर जेष्ठ, कामगार याची सुरक्षा व प्रात्यक्षिक केले.तचेच 2 वेळा जागतिक आपत्ती परिषदेत उपस्थिती व वर्षभर भारत सरकारच्या  राष्ट्रीय आपत्ती संस्थेत वर्षभर ऑनलाइन प्रशिक्षण घेतल्याचा लाभ रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतिल मुले, महिला नागरिक यांना व्हावा म्हणून 804 ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम व्हावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,उपाध्यक्ष सुधाकर घारे आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी परवानगी दिली आहे म्हणून त्याचे आभार त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पहिली आपत्ती सुरक्षितेचे धडे देणारी रायगड जिल्हा परिषद होणार आहे हे माझे देशभरातील 417 वे मार्गदर्शन आहे असे पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सॊ.अनिता शेंडे,सॊ.अहिल्या पाटील, सॊ.ममता मानकर,रोहन पाटील ग्रामपंचायत सदस्य, आणि श्री.सॊ.जोगळेकर सर,पूजा पेडणेकर आपत्ती व सुरक्षा मित्र,वर्षा चांदोरकर,मीना गोधळी, आराधना जोशी,रुपाली आंबेतकर अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, शेवटी सरपंच सॊ.स्वाती पाटील यांनी आभार मानले.

    Post Views:  232


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व