अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून अकोला जिल्ह्यात १११ गुन्हे उघडकीस
पातुर प्रकरणातील मुलगी व आरोपी कोल्हापूर येथून ताब्यात
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Dec 2023, 9:57 AM
अकोला - अकोला पोलिस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून पातूर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीला कोल्हापूर जिल्ल्ह्यातील कागल येथून पिडीत मुलीसह ताब्यात घेण्यात आले असून या कक्षाकडून आतापर्यंत १११ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला व बाल अत्त्याचार संदर्भातील भादंवी च्या कलम ३६३ व ३६६(अ) नुसार नोंद झालेल्या या सर्व प्रकरणांमध्ये ७८ गुन्हे व ३३ हरविल्याच्या तक्रारीसह १११ प्रकरणांचे शोधकार्य पोलिसांनी तपासाअंती पूर्ण केले आहे.
पातूर पोलिस स्टेशनमध्ये अपराध क्र. ५३०/ २०२३ क भादंवी ३६३ मधील नोंद झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यात आला असता विविध ठिकाणी जाऊन खात्रीलायक माहितीनुसार पोलिस कोल्हापूर येथे दाखल झाले.जिल्ह्यातील कागल येथे जाऊन या प्रकरणातील आरोपीला पिडीत मुलीसह ताब्यात घेण्यात आले.गुन्ह्याची डायरी प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांत हा तपास पूर्ण करण्यात आला.
सदर कामगीरी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे व शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खर्चे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर,धनराज चव्हाण,मपओकॉ पूनम बचे,पोकॉ.अविन्द्र खोडे, मनापोकॉ.गीता अवचार, आशिष आमले,राहूल सानप,गोपाल ठोंबरे यांनी पूर्ण केली असून ईतर गुन्ह्यांचा ही तपास सुरू आहे.
Post Views: 152