श्री शिवाजी विद्यालयातप्रवास छंद शिबीराचे आयोजन
अकोला- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला या ठिकाणी प्रयास छंद शिबिराचे आयोजन दिनांक 16 एप्रिल 2024 ते सोमवार दिनांक 6 मे 2024 या दरम्यान आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना चित्रकला गायन वादन नाट्य नृत्य वक्तृत्व व्याकरण गणित हस्तकला खेळ योगा इत्यादी विविध विषयांचे मार्गदर्शन त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्फत दरम्यानच्या काळात मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यास या शिबिराचे शाळेमार्फत आयोजन केलेले आहे .तरी गरजू विद्यार्थ्यांनी या उन्हाळी प्रयास छंद शिबिरामध्ये सहभागी घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे शालेय प्रशासनामार्फत कळविण्यात येत आहे
Post Views: 239