पै.श्री.अभिजीत विनायक भालेराव यांची सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांचे पुणे जिल्हा समन्वयक पदी निवड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Nov 2022, 8:57 PM
   

कुस्ती , कराटे, निंजा अशा विविध साहसी खेळांचे क्रीडाप्रेमी असा नावलौकिक असणारे पै.श्री.अभिजीत विनायक भालेराव, यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना , ग्लोबल पीस कौन्सिल, भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्यूज २४ संलग्न
माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या ( पुणे शहर - उपाध्यक्ष )  पदावर  आणि
सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांचे पुणे जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे.
कोंढवा बु.येथील रहिवासी असलेले व विविध क्षेत्रांतील योगदान असणारे ; श्री.भालेराव, हे मा.प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती तथा तत्कालीन राज्यपाल ( राजस्थान ) यांचे उपस्थितीत पुरस्कार विजेते असून ते अखिल भारतीय स्तरावरील काय॔रत असलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विद्यमान सदस्य, मानव विकास गुरुकुल, पुणेचे माजी शैक्षणिक समिती - सदस्य व माजी कॅम्प ट्रेनिंग इनचाज॔ या आणि अशा विविध क्षेत्रांतील अनेक पदांवर ते  काय॔रत आहेत.
या निवडीमुळे  सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे...

    Post Views:  147


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व