बोईसर मध्ये अनधिकृत बांधकाम चा सुळसुळाट मात्र प्रशासन झोपेत...
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
09 Dec 2022, 3:40 PM
पालघर (संतोष घरत) - पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामपंचायत हद्दीत गजानन कंपाऊंड, जमुना टॉकीज बोईसर जुना सर्वे नंबर 114 मध्ये अनधिकृत बांधकाम सुरु आहे, सदर सर्वे नंबर ची जमीन ही खालसा होऊन ती शासन जमा झालेले आहे.ह्या अनधिकृत बांधकाम थांबवण्याकरिता बोईसर ग्रामपंचायत ने रीतसर नोटीस बजावली आहे. तरी त्यांना न जुमानता तेथील विकासकाने आज पर्यंत काम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सुरु असलेले काम त्वरित बंद न केल्यास त्या ठिकाणी इमारत उभी झाल्यास त्या इमारती मधून सदनीका विकत घेणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊन त्यांना नुकसानाला सामोरे जावे लागेल, सदर काम हे असेच सुरु राहते की ग्रामपंचायत बोईसर व मंडळ अधिकारी बोईसर ह्यांच्यावर तोडक कारवाई करेल की नाही? की नेहमी प्रमाणे जैसे थे चालू राहील हा मोठा गंभीर प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे.
Post Views: 315