अकोला : अकोला महानगरपालिका पूर्व झोन मधील येण्याऱ्या प्रभाग क्र ३ व ६ मधील विविध कामे मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मनपा कार्यालय येथे एक निवेदन सादर केले त्यात प्रामुख्याने कोर्ट ते आनंद बेकरी रस्त्यावरील नाली बांधकाम,तापडिया नगर मधून वाहणारा मुख्य नाल्याची मान्सूनपूर्व साफसफाई तसेच कोर्ट ते सातव चौक रस्त्यावरील झाडांची छाटणी करणे जेणेकरून पथदिव्याचा उजेड रस्त्यावर पडेल अश्या मुख्य मागण्या निवेदनात आहेत.मनपा आयुक्त रजेवर असल्याने शहर अभियंता तथा उपायुक्त वंजारी मॅडम ह्यांना निवेदन देऊन तात्काळ क्षेत्रीय अधिकारी(पूर्व झोन) ह्यांना जागेवर बोलावून कामाच्या ठिकाणांची पाहणी मनसे पदाधिकारी ह्यांनी केली व क्षेत्रीय अधिकारी ह्यांनी तात्काळ कामे मार्गी लावण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे
सदर निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,महानगर अध्यक्ष सौरभ भगत ह्यांच्या नेतृत्वाखाली उपशहर अध्यक्ष राजेश पिंजरकर ह्यांनी दिले.निवेदन देतांना जिल्हा सचिव ललित यावलकर, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे, रुपेश तायडे,प्रवीण अवचार,मनविसे उपजिल्हाध्यक्ष डॉ जय मालोकार , संतोष बोर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 165