अकोला : जळगाव येथे संपन्न झालेल्या सीबीएसई दक्षिण झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलच्या पलक अजय झामरे हीने सुवर्ण तर प्रशिष गवई याने रौप्य पदक प्राप्त केले असून त्यांची सीबीएसई राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
केंद्रिय माध्यामिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली अर्थात सीबीएसई द्वारे दक्षिण झोन-२बॉक्सिंग स्पर्धा जळगाव येथील ओरियन इंग्लिश मेडीयम स्कूल येथे दि. १६ ते २० डिसेंबर दरम्यान संपन्न झाली.
या स्पर्धेत १७ वर्षाखालील ४८ किलो वयोगटात पलक झांबरे हिने उत्कृष्ट खेळ सादर केला. पलकने लोकमान्य टिळक विद्यालय, मुबंईच्या बॉक्सिंगपटूचा अंतिम सामन्यात पराभव करुन सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे मुलांच्या ४६ किलो वयोगटात प्रशिष गवई याने रौप्यपदक प्राप्त केले. पलक आणि प्रशिष या दोन्ही विजयी खेळाडूंना प्रभातचे बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल वानखडे व रिया ताराम यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ.वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले आहे तर प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वय मो. आसिफ, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 207
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay