संतोष उर्फ विश्वासराव देशमुख यांची कविता


 Chief editor  2021-11-20
   

स्पर्धेच्या युगात
खंत होते मनाला कधि , जेव्हा आपलाच रूष्ठ होतो ।
विकास सहवेना त्यास , 
जिव्हारी येऊन दुर होतो।।

काय भावना जाणावी , त्याच्या मनातली मी ।
जाणून घेण्या अगोदर,त्यास ओळखून होतो।।

वाहरे वाह जमाना, घोळका इथे स्वार्थी बोलक्यांचा ।
मनास धिर देऊन,मी मलाच समजावित होतो।।

ठरवले एकदा मनाशी,स्पर्धा नको कशाची ।
अशा स्पर्धेच्या युगात,मी कधिचाच दुर होतो ।।

विश्वास ठेवू कुठे कुठे,माझेच मला भारी । 
प्रेमाने जगण्यासाठी ,फक्त तुमच्यात आलो होतो।।

शब्दांकन©®
विश्वासराव देशमुख
शेगाव { निंबा }.
????????????जयगुरू????????????

    Post Views:  340


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व