सेवाव्रती श्रीधररावजी देशमुख......


श्रीधररावजी जयंती उत्सवातील प्रास्तावित भाषण
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-03-04
   

विसाव्या शतकात भारतात व महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील महान कर्मयोगी संत होते. सेवाभाव हा त्याचा स्थायीभाव होता. 23 फेब्रुवारी रोजी गाडगे बाबांचा जन्म झाला होता, व 23 फेब्रुवारी रोजीच अकोला जिल्हयातील बाळापूर तालूक्याच्या  निंबा या गावी आणखी एक सेवाव्रती, कर्मयोगी जन्माला आले. ते म्हणजे श्रीधरराव देशमुख....! 
जे गावात व परिसरात मालक या टोपण नावाने ओळखले जात आजच्या काळात मालक या शब्दाला भांडवलदारीचा दुर्गंध येतो, परंतु श्रीधरराव देशमुख यांच्यासाठी वापरले जाणारे मालक हे विशेषण म्हणा, की त्यांना दिलेली पदवी म्हणा. यात पालकत्वाची भावना महत्त्वाची आहे. मालक  म्हणून ओळखले जाणारे देशमुख साहेब गावागावाचे पालक होते. म्हणून त्यांना मिळालेली मालक ही पदवी पालकत्वाच्या भावनेतून अत्यंत प्रेमाने आदराने जनसामान्यांनी त्यांना बहाल केली होती. मराठी चित्रपट कायम अत्याचार करणारे, गावगाडा शोषण करणारे पाटील देशमुख अनेकदा रंगवले जातात. परंतु चालविणारे व सर्व गावाला आपले मानणारे सेवाभावी वृत्तीचे देशमुख / पाटील अनेक होऊन गेले. तुकारामाचे अभंग प्रत्यक्ष वाचून त्यानुरूप सेवा भाव जागवून संतांचे संदेश त्यांनी गावगाडयात निष्ठेने आचरणात आणले. जीवनभर ने ग्रामजीवनाची सेवा करीत राहिले. कितीतरी विकासकामे करून परिसराचा संपूर्ण कायापालट करणारे ते कर्मयोगी पुरूष होते. ते गेल्यावरही  त्यांची नोंद मात्र मराठी साहित्याने वस्तुनिष्ठपणे घेतली नाही, ही खेदाची बाब आहे.  देशमुख कादंबरीतील  काल्पनिक भुमिका वाटावी अशी ही ग्रामीण भागातील एक खरीखुरी व्यक्तरेखा होती. संताच्या शिकवणुकीचा ग्रामीण भागात जास्त प्रभाव दिसून येतो. त्यांचे व्यक्तिमत्व सुध्दा संतसंदेशानुरूप आविष्कृत झालेले एक संपन्न व्यक्तिमत्व होते. कामातच ते राम पाहत.नित्यनियमाने ते तुकाराम गाथेचे वाचन करीत व तसेच जीवनात जगत असत. तुकारामाने स्वत: सेवा केली व आपल्या शिष्यांना तसे संदेश दिले. श्रीधररावानी संत तुकाराम , व सतांचा  सेवाभाव कामात आणला. ग्रामीण परिसरात त्यांनी मोठमोठी सेवाकार्य सातत्याने केली. ग्रामीण भागातील लोकांसाठी शाळा रस्ते पिण्याचे पाणी आदी सुविधांसाठी परिश्रमपूर्वक व वेळप्रसंगी स्वत: जवळील निधी खर्च करून हे उपक्रम पूर्ण केले. राष्ट्रसंतांनी माणूस द्या मज माणूस द्या ’ अशी याचना केली. कदाचित राष्ट्रसंतांची व श्रीधररावांची भेट झाली असती तर राष्ट्रसंत म्हणाले असते की , मी ज्या माणसाच्या शोधात होतो तो माणूस आज मला सापडला आहे . राष्ट्रसंतांचा खर्‍या अर्थाने देवमाणूस म्हणजे श्रीधररावजी देशमुख साहेब...! श्रीधररावांनी आपल्या गावाचा व आपल्या परिसराचा चेहरामोहरा अनेक सोयी सुधारणा करून बदलवून टाकला. ते एक महान सेवाव्रती होते , ते द्रष्टे होते . समाजात त्यांना मान होता. आमदार, मंत्री इत्यादी लोकांशी त्याचे स्नेहसबंध होते . एक नि:स्वार्थ व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता. गावातील प्रत्येक व्यक्ती जणू आपल्या कुटूंबाचा भाग आहे असे त्यांना वाटे. ते त्यांच्या सुख दु:खात सहभागी होऊन त्यांच्या कल्याणासाठी सदैव झटत असत. सर्वांचे कल्याणकर्ते म्हणून केवळ गावातच नाही तर परिसरात त्यांचा नावलौकिक होता. ते गर्भश्रीमंत होते.  मुबलक शेतीवाडी त्यांच्याकडे होती. त्यांचा वाडा हा एखादया भव्य हवेली सारखा होता. परंतु त्यांचा वाडा हे त्यांच्या गावाचे व त्याच्या परिसराचे आश्रयस्थान होते. या वाडयात मोठ्या प्रमाणात सण - उत्सव साजरे केले जात होते. यामध्ये गोरगरिबांना सहभागी करून घेतले जाई. त्यांना संगीताची आवड होती. गळयात विणा अडकवून शास्त्रीय ढंगाने ने भजने गात असत. त्यांचे भजन, गायन, श्रवण करणे ही एक आनंदाची पर्वणीच असे. त्यांना काकडा आरतीची आवड होती. आपरभाव त्यांच्या ठिकाणी नव्हता. सर्वांना ते समान लेखीत असत. ते अत्यंत कनवाळू व धार्मिक वृत्तीचे होते . त्यांचे व्यक्तिमत्व विविध सद्गुणांनी युक्त होते. खादीचा पांढरा कुर्ता व धोती असा त्यांचा पेहराव असे. विनम्रता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैभव होते. कोणाचेही म्हणने ते अतिशय एकाग्रतेने ऐकत असत, व त्यानंतर त्याला न दुखवता आपले मत मांडत असत. त्यामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली व अजातशत्रु या संज्ञेला ते पात्र झाले. ते छोट्या गावात राहत असले तरी त्यांची वृत्ती वसुधैव कुटुम्बकमची होती. त्यांच्या ठिकाणी सर्वधर्मसमभाव होता. भेदाभेद, विषमता यांचा स्पर्शही त्यांच्या व्यक्तिमत्वाला झाला नव्हता. मंदिरातल्या किर्तनात ते जेवढे उत्साहाने भाग घेत तेवढयाच उत्साहाने मुस्लिम धर्मियांच्या इदमध्ये सामिल होत होते. आपले संपूर्ण गाव हे आपले एक कुटुंब आहे, अशी त्यांची धारणा होती. गावातल्या बैठका असो, विवाह असो, वा  इतर कुठलाही कार्यक्रम असो, विश्वस्त म्हणून ते केवळ मारूती संस्थानची भांडीकुडी उपलब्ध करून देत असत, तर पैशाचीही मदत करीत असत. कुठे काही घडलं तर मध्यस्थी करीत असत . कुठलाही वाद सोडविण्याचे कसब त्यांच्या ठिकाणी होते. गावातील कुठल्याही माणसाची समस्या ही त्यांना न्याय्य वाटली तर त्यासाठी ते स्वखर्चाने सरकार दरबारी जात व आत्मियतेने ती समस्या सोडविण्याचे प्रयत्न करीत. त्यांच्या आत्मियतेची व नि:स्वार्थ सेवेची ख्याती केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रभर पसरली होती. ते स्वतः जात तेव्हा त्यांची कामे होतच होती, परंतु केवळ त्यांचे नाव जरी सांगितले तरी सरकारी दरबारी अनेकांची अनेक कामे सहजरित्या होऊन जात होती. त्यांच्या काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सोयी उपलब्ध नव्हत्या . त्यांनी त्या उपलब्ध करून दिल्या. विदर्भ हा अतिथ्य करणारा भूप्रदेश आहे. श्रीधरराव बाप्पू  अत्यंत आदरातिथ्य करणारे होते. त्यांनी केलेले आदरातिथ्य व त्यांनी दिलेला पाहुणचार अनेकांच्या दिर्घकाळपर्यंत स्मरणात आहेत. अनेकदा एकावेळी पन्नास - पन्नास लोक त्यांच्याकडे जेवत असत. मंत्री , सरकारी अधिकारी यांचे आदरातिथ्य व त्यांना पाहुणचार करण्यात त्यांना आनंद वाटत असे. त्याकाळी त्यांच्या गावात पाण्याची समस्या अत्यंत भीषण होती. प्यायला पाणी नव्हतेच, पण वापरायलाही पाणी नव्हते. बरेच प्रयत्न करूनही गावातील पाण्याचा प्रश्न मिटला नाही. तेव्हा त्यांनी एक शक्कल लढवली. मंत्री महोदयांना जेवायचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे मंत्री महोदय आले. जेवतांना त्यांना पाण्याऐवजी तुप प्यायला देण्यात आले.आमच्या गावात पाणीच नसल्यामुळे तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, असे नम्रपणे मंत्री महोदयांना त्यांनी सांगीतले. मंत्री महोदयांना पाणी प्रश्नाचे गांभिर्य लक्षात आले, व त्यांनी गावात पाणी योजना आणली. अशी कितीतरी जनहिताची कामे त्यांनी केली. पाण्याप्रमाणेच त्यांनी रस्त्याचा प्रश्न सातत्याने प्रयत्न करून सरकारकडून सोडवून घेतला. निंबा परिसरात रस्ते झाले त्याचे श्रेय त्यांनाच होते.  ते अत्यंत पापभिरू, सात्विक आणि धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी आपल्या गावात व परिसरात शाळा, वसतीगृहे, बँक केल्या त्याचप्रमाणे आरोग्य केंद्र, गुराचा दवाखाना, सेवा सहकारी सोसायटी, दुध संकलन केंद्र , शासकीय विश्रामगृह, बसस्थानक इत्यादी सोयी दिल्या. निंबा येथे पोस्ट ऑफीस सुरू करण्याचे श्रेय सुध्दा त्यांचेच आहे. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरात महापूर येत असत. महापुरात फार मोठया प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी होत असे. अशावेळी ते पीडीत कटुबीयांना आश्रय देत, आधार देत.  त्यांना आर्थिक मदतही करीत असत. आज वृक्षारोपणाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. परंतु त्यांनी झाडे लावा, झाडे वाढवा ही योजना त्यावेळी  अनेक वर्षे  आपल्या गावात - परिसरात यशस्वी केली. भावी पिढी संस्कारक्षम व्हावी म्हणून त्यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले.  त्यासाठी विविध आवश्यक उपक्रमाचे आयोजन केले. खेळ, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली यासाठी ते नेहमी आग्रही असत. विद्यार्थ्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून त्यांनी समर्पित, सेवाभावी व निष्ठावंत शिक्षकांची फळी तयार केली होती. त्यांनी आपले गाव व आपला परिवार आदर्श केला व आपल्या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळवून दिला. सेवाभाव हा त्यांचा स्थायीभाव होता. जनकल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहून घेतले होते. शक्यतोवर ते कोणतेही पद घेत नसत. त्यांनी केलेल्या प्रचंड सेवा कार्याबद्दल व परिसर विकासाबद्दल गावकर्‍यांनी त्यांचा मोठया प्रमाणात सत्कार आयोजित केला होता. तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील त्यांच्या सत्कार समारंभाला आवर्जुन उपस्थित होते. या एका गोष्टीवरूनही त्यांचे मोठेपण लक्षात येते. माणसाप्रमाणेच ते पशुपक्षांची सुध्दा काळजी घेत असत. भूतदया हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्वाचा घटक होता. आपलं गाव , आपला परिसर याच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असत. आई ह्याच त्यांच्या गुरू होत्या. ते अत्यंत दानशूर होते. त्याचा उल्लेख कलियुगातील कर्ण असा करणे अत्यंत उचित ठरणारे आहे. दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी आपल्या घरातील धनधान्य गोरगरिबांना वाटून दिले. 
सन 1 9 30 साली स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्यांनी गावागावातून मुष्टीफंड गोळा केला व सात पोते धान्य गोळा केले. ते विकास पुरुष होते. त्यांच्या ठिकाणी नेतृत्व, दातृत्व व कर्तृत्व याचा सुरेख संगम झालेला होता. त्यांनी आपले आयुष्य समाजसेवा परराष्ट्र सेवेत घालवले. ते एक कर्मयोगी व सेवाव्रती होते. एक निस्वार्थ, निःपक्ष व निष्काम सेवाव्रती स्व. श्रीधररावजी देशमुख, निंबेकर, ज्यांनी गाव व परिसराच्या विकासार्थ आपले जीवन , तन, मन, धनासह वेचले. त्यांच्या ह्या आदर्श समाजकार्यातून उतराई होण्यास्तव त्यांच्या 99 व्या जयंती दिनापासून (23 फेब्रुवारी 2022 ते 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत) ते 100 व्या जयंती दिनापर्यंत जागर वर्ष साजरे करण्याचे आम्ही आपल्या सहाकार्याने योजले आहे. श्रीधर पर्व स्व. श्रीधरराव देशमुख जन्म शताब्दी महोत्सव आयोजन समितीच्या वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत करतो. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच पालक व शिक्षक, विद्यार्थी, महाराष्ट्र भूषण छत्रपती श्री शिवाजी महाराज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, स्व. श्रीधरावजी देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो... या विद्यालयाची स्थापना 1 9 64 साली झाली असून येथील सर्व विभाग अनुदानीत आहेत. वर्ग 5 ते 12 चे एकूण 2006 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . सद्या सर्व 27 शिक्षक व 6 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. आर्थिक व्यवस्था - सन 2020-21 या सत्रामध्ये कोणत्याच विभागाला वेतनेवर अनुदान प्राप्त झाले नाही. क्रिडा अनुदानामधून व्यायाम शाळा 7 लाख व भांडारगृह बांधकाम पूर्ण करण्यात आले . कंम्पाउन्ड बनविणे व व्यायाम शाळेच्या साहित्या करीता मा कीडा अधिकारी, अकोला यांच्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत खोल्याच्या दुरुस्ती व फरशी बांधकामाकरीता संस्थेमार्फत रु 12,36,311/ - मिळाले होते त्यानुसार पूर्ण बाधकाम करण्यात आले मुख्याध्यापकांनी जमा केलेल्या रकमेतून कीचन जोड स्व श्रीधरराव बाप्पू रंगमंचावर सिरमिक व ग्रेनाइट लावण्यात आला रगमचाच्या आजुबाजूला कांक्रीटीकरण करून कोटा लावण्यात आला . विद्यार्थ्यासाठी मुतारी बाधण्यात आली. शाळेला जाळीचे कंम्पाउड करण्यात आले तसेच कॉम्प्युटर कक्षाला स्लायडींग विडो एलईडी टीव्ही, पुर्ण शाळेला कलरींग व नवीन दीनाचे कराडे व रंगमंच, 300 डेक्सवेचचे कलरींग करण्यात आलेत.
विद्यार्थ्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी दोन टाक्या व नळ , मिटीगसाठी लागणार्‍या 30 चेयर , सायकल स्टॅन्ड , प्रत्येक रूममध्ये दोन टयुव लाईट व दोन पंखे बसविण्यात आले. अद्यावत साऊंड सिस्टीम लावण्यात आली. असे अनेक कामे करण्याचा प्रयत्न केला . शाळेचा निकाल सन 2020-21 चा एस एस सी परीक्षा निकाल 100 टक्के एच एस सी विभाग 100 टक्के व्होकेशनल विभाग 100 टक्के लागला. गावात 2 शिक्षकांची नेमणूक करून त्यांनी ते गाव दत्तक घेउन विद्यार्थ्यांना आठडयातून तीन दिवस भेट देऊन कार्य यशस्वी पार पाडले याची दखल वर्तमान पत्राने सुध्दा घेतली . तसेच शासनाच्या परीपत्रकानुसार वसंतराव नाईक वृक्ष लागवड अंतर्गत एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला व संस्थेच्या पत्रकानुसार प्रत्येक कर्मचारी यांनी प्रत्येकी 5 वृक्ष लावण्याचे सुचित करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही केली व तसा अहवाल संस्थेला पाठविला आहे . भारतीय स्वातंत्र्याच्या 74 वा वर्धापन दिनानिमित्य ऑनलाईन वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व काव्यगायन स्पर्धा घेण्यात आली.
हेमंत काळमेघ, सदस्य-व्यवस्थापन समिती
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती

    Post Views:  264


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व