मोरगाव भाकरे येथील सतत चोऱ्यांचे सत्र उरळ पोलिस स्टेशनने इकडेही जरा लक्ष देण्याची मागणी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Feb 2025, 9:42 AM
अकोला- मोरगाव भाकरे परिसरात एकामगे एक चोऱ्यांचे सत्र सुरू झाले असून येथे पाच ते सहा महिन्यां अगोदर चार ते पाच शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा च्या मशीन चोरट्यांनी लंपास केल्या. ते होत नाही तर दोन ते तिन महिन्यापूर्वी आधी तीन ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरी गेलेले आहेत. तर मोटर सायकला चोऱ्यांची प्रकरणं वाढत असल्याने नागरीक चिंतातुर झालेले आहेत. मागच्या शनिवारी रुसलाबाद येथील बाबूलाल लोड यांच्या मालकीची गाडी त्यांच्या घरासमोरून रात्री दीड ते दोन च्या दरम्यान चोरट्यांनी नेली आहे.या घटनेला एक हप्ताही ओलांडत नाही तोच अजून एक गाडी मोरगाव भाकरे येथील पांडूरंग इंगळे यांच्या मालकीची हिरो पॕशन एम.एच.३० बि.ए.०१९६ ही गाडी त्यांच्या घरासमोरून दि.१६/०२/२०२५ रोजी रात्री चोरट्यांनी पळवून नेली आहे.
ह्या एकामागून एक चोरीच्या घटनांनी मोरगाव भाकरी येथील नागरिक भयभीत झालेले आहेत. तरी उरळ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
Post Views: 254