सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Oct 2026, 8:17 AM
अकोलास्थित गिरीनगर परिसरातील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय येथे भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती प्रीत्यर्थ वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून दिनांक 15-10-2026 रोजी ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.ग्रंथ प्रदर्शनीचे उदघाटन सुधाकरराव नाईक कला,वाणिज्य व उमाशंकर खेतान vidhnyan महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अंबादासजी पांडे सरांचे शुभ हस्ते व ह्या ग्रंथालयाचे जेष्ठ वाचक श्री. रमेशजी ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.कार्यक्रमात माॅउन्ट लिटेरा झी स्कूल,अकोला या नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यापक वृंद श्री. विशाल गवई सर,नितेश गावंडे सर, वैष्णवी आडे मॅडम आपल्या विद्यालयातील सुमारे 80 विद्यार्थी-विद्यार्थीनी समवेत हजर राहून ग्रंथ प्रदर्शनीतील ग्रंथांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्याचप्रमाने ग्रंथ प्रदर्शनीस सुधाकरराव नाईक कला ,वाणिज्य व उमाशंकर खेतान vidnyan महाविद्यालय अकोला या प्रथितयश संस्थेचे डाॅ.भास्कर पाटील सर,डाॅ.ए.बी.मेश्राम सर,एन.एफ.चव्हाण सर,डाॅ.एस.ओ.तिहीले मॅडम ,वाय.एम
चव्हाण सर,पदमाकर सदानशिव हे प्राध्यापकवृन्द ह्यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शनीस भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.शालिग्राम उके यांनी वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शनीच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले.प्रमुख वक्ते प्राचार्य डाॅ.अंबादासजी पांडे यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या संघर्षमय जीवनाची विस्तृत माहिती दिली आणि त्यांच्या कार्याची महती सांगून त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन शून्यातून विश्व कसे निर्माण करता येते हे उदाहरण देऊन स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.रविना कांबळे ह्यांनी तर आभारप्रदर्शन कु.रेश्मा सोनोने ह्यांनी केले.संपुर्ण कार्यक्रमाच्या व ग्रंथ प्रदर्शनीतीच्या यशस्वितेसाठी सुधाकरराव नाईक कला,वाणिज्य व उमाशंकर खेतान विद्न्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.वैष्णवी गोहाड,पायल रामचवरे,अचल कांबळे,आदिश्री हिरुरकर,प्रियंका जामनिक, वार्षिका वानखडे,संविधान कांबळे व प्रमिला यादव यांनी विषेश परीश्रम घेतले.ग्रंथ प्रदर्शनीचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असे संस्था सचिव डाॅ.शुभांगी उके कळवितात.
Post Views: 13