अकोला बार टायपिस्ट असोसिएशने केला नवनिर्वाचीत वकील कार्यकारिणीचा सत्कार
अकोला - अकोला बार असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड. सी.एन. वानखडे, उपाध्यक्ष अॅड. शंकर ढोले, सहसचिव अॅड. विजय यावलकर साहेब, महिला उपाध्यक्ष अॅड. कांचन शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार टायपिस्ट असोसिएशनच्या वतीने दि. १५/२/२०२२ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अर्चनाताई गावंडे होत्या, तर प्रमुख उपस्थितीमध्ये वरील नवनिर्वातीच अध्यक्ष व पदाधिकारी होते. यावेळी अॅड. अर्चनाताई गावंडे, अॅड. सुमेध डोंगरदिवे यांचाही सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांनी बोलतांना म्हटले की, सर्वांना सोबत घेवूनच मार्गक्रमण करावयाचे आहे, जे-जे चांगले करता येईल ते-ते करू कोणीही दुखावले जाणार नाही तसेच सर्वांचे हिताचे काम निश्चीतच होईल असे आश्वासन अध्यक्ष अॅड. सी.एन.वानखडे यांनी दिले.
सत्कार करणारामध्ये बार टायपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा पत्रकार पंजाबराव वर, उपाध्यक्ष-सौ. जयश्री विसपुते मॅडम, सचिव-राजेश परदेशी, कोषाध्यक्ष -अजय प्रकाश वानखडे, सर्व सन्माननीय सदस्य सर्वश्री आकाश दत्तात्रय खडसे, संजीव चवरे, मोहम्मद कमरुद्दीन, मनिष बागडे, सागर काशीकर, सौ. संजना बोरकर, शेख बिसमिल्ला, कपिल इंगळे, संजय इंगळे, मोहम्मद सोहेल, स्नेहल गवई, सिद्धार्थ तायडे, चैतन्य तायडे, हिम्मतराव तायडे, नितीन दुरतकर, आदीत्य गावंडे, सौ. जयश्री विसपुते, श्रीमती क्रांतीताई तेलगोटे, सौ. प्रिया ढोरे, सौ. सोनाली बोरीकर, कु. कल्याणी गुहे, अश्विन तारापुरे, अमोल बेलोकार, संकेत सुनिल क्षिरसागर, यांचेसह अॅड. एम.एस.इंगळे, अॅड. दामोदर साहेब, अॅड. शर्मा साहेब, अॅड. साखरकर साहेब, अॅड. भीमराव इंगळे, अॅड. सुमेध डोंगरदिवे, स्वागतपर कार्यक्रमाचे संचालन साहित्यिक पंजाबराव वर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश परदेशी यांनी मानले सर्वांना मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 281