भागवत कथेप्रमाणे संविधान कथा लावा-सुरेश पाटील झालटे


कापशीत संविधान दिन साजरा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Nov 2022, 8:46 AM
   

कापशी रोड (मंगेश चऱ्हाटे) - भागवत कथेप्रमाणे गावागावात संविधान कथा लावा असे आवाहन प्रबोधनकार सुरेश पाटील झालटे यांनी केले आदर्श गाव कापशी रोड येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुरेश पाटील बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, संविधान कथा गावोगावी लागल्यास  कायद्याचे ज्ञान होईल, स्वतःच्या अधिकाराची जाणीव, होईल, आपण घटनेने आरक्षण दिल्यामुळे सरपंच झालो याची जाणीव होईल,यातूनच सक्षम भारत घडू शकेल असा विचार त्यांनी या वेळी उपस्थित शेकडो नागरिकांत पेरला. या वेळी अध्यक्षस्थानी स्थानिक स्वराज्य सस्थेंचे अध्यक्ष अंबादास उमाळे होते. तर प्रमुख उपस्थितीत  अजाबराव तायडे, नाना किरतकार तसेच लाखनवाडा सरपंच किशोर गावंडे, निबी मालोकारचे सरपंच निलेश मालोकार, अंकुश पाटील इंगळे कापशी तलाव सरपंच आशा राठोड, शिंदखेड सरपंच शांता सोळंके, चिखलगाव सरपंच निर्मला सोळंके, उपसरपंच पंकज वानखडे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश यादव शशिकांत इंगळे,आदी उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख वक्ते सुरेश पाटील व उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,  आदींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थींनी पुर्वा चऱ्हाटे, स्नेहल वाठोरे, उन्नती सरपाते  यांनी मराठी मध्ये तर आदर्श काँन्व्ंंट च्या विद्यार्थी रुद्र गुट्टे यांनी इंग्रजी भाषेत भारताचे संविधान वाचन केलं, त्यानंतर प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन च्या वतीने संविधानता आपल्या भारताच्या नागरिकांना काय काय अधिकार दिले आहे त्याची नाटीका साकारली. मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थिती मध्ये सुदामा चऱ्हाटे गजानन पाकदूने, चंद्रकांत बावस्कर, कैलास उंबरकार, अंबादास पाचपोर, मंगेश साटोटे, श्रीकृष्ण वडतकार, गंगाधर खाकरे,  वासुदेव धुमाळे, विठ्ठलराव बिल्लेवार, सचिन थुटे, विशाल रोहणकार, गजानन फेंड, पुरूषोत्तम उमाळे, पांडुरंग उंबरकार, संजय भालतिलक, राजेश डोंगरे,मधुकर तायडे, प्रमोद इंगळे, भरत सोनोने, समाधान इंगळे, अजाबराव तुकाराम तायडे,काशिराम तायडे, सोनु यादव, 
 रमेश केवट, संचालन राजेश ढेरे यांनी तर प्रास्ताविक राजेंद्र इंगोले यांनी केले. आभार वार्ताहर श्री मंगेश  चऱ्हाटे यांनी मानले.

    Post Views:  164


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व