जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
11 Jan 2023, 6:45 PM
अकोला : घरात घुसून मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपळगाव हांडे येथील रहिवाशी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन पिंजर येथे 1 जानेवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये आरोपी राजू मोतीराम पवार वय 40 राहणार पिंपळगाव हांडे यांनी घरासमोर येऊन पती दीर आणि तक्रार करती महिला यांना जातिवाचक शिवीगाळ करून काठी व लाथा बुक्क्यासह दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून भांदवी कलम 323, 504, 506, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम 1989 चे कलम 3(2) (व्ही ए) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल करण्यात आल्या नंतर आरोपीला शोधण्यासाठी पिंजर पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. आपल्यावर झालेल्या अन्यायाची आणि खोट्या गुन्ह्यात कडकविल्याची दाद पवार यांचे वकील अॅड. सुमित महेश बजाज यांचेमार्फत जिल्हा न्यायालयात मागितली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पतंगे यांच्या न्यायालयाने आरोपी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने अॅड. सुमित महेश बजाज, अॅड. रफिक ख्वाजावाले, अॅड.भाग्यश्री किटे यांनी काम पाहिले.
Post Views: 120