कापशी येथे बैलपोळा उत्साहात साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Aug 2022, 10:00 AM
   

कापशी : पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह मात्र जोमात होता. गेली दोन वर्ष या सणावरही  कोरोनाचे सावट होते. त्यामुळे बैलजोडीची ढोल ताशाच्या गजरात मिरणवूक तर सोडाच पण साधा  साजश्रृंगारही केला गेला नव्हता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे मात्र, नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांची पाठ ही सोडलेली नाही. खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच सुरु झालेले संकट अद्यापही कायम आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी या सर्व संकटाला बाजूला सारुन कापशी रोड येथील शेतकरी शेतमजुर यांनी पोळा सण उत्साहात साजरा केला आहे. बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. काळाच्या ओघात शेतकऱ्यांचा यांत्रिकिकरणावर भर असला तरी आपली परंपरा जोपासत बैलजोडीच्या मिरवणुका उत्साहात पार पडली यावेळी गावच्या गोठाणावर सर्व गावातील शेतकरी त्याच्या बैलांना सजून धजून वाजत गाजत आणून गावातील सर्व नागरिक बैलांचे पुजन करून उत्साह साजरा केला या महादेवाचे गाणे गायले गेले व त्यानंतर फटाके फोडून बैलांना शेतकरी गावात घेऊन महिलांनी पुजा केली 
ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक
शेतकऱ्यांनी केवळ परंपराच टिकवली नाहीतर आपला उत्साह ही दाखवून दिला आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा सण साजराही करता आलेला नव्हता. यंदा मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात सण पार पडला आहे. बैलजोडीची गावातून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली होती . शिवाय ठिकठिकाणी पूजाही केली जाते.

    Post Views:  256


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted