जनरल प्रॅक्टिशनर्स हा समाजाच्या आरोग्याचा आत्मा होय : डॉ.गजानन नारे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Aug 2023, 2:36 PM
   

अकोला : जनरल प्रॅक्टिशनर्स हे समाजाच्या आरोग्यासाठी आत्मा असून समाजातील विविध घटकांचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी अहोरात्र झटतात . असे उद्गार प्रभात किड्सचे संचालक डॉ . गजानन नारे यांनी जिपीए च्या डिरेक्टरी तथा स्मरणिकेचे प्रकाशन प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले , पुढे त्यांनी स्मरणिका मधील आरोग्यविषयक लेख हे जनसामान्यांना दैनंदिन आयुष्यात कसे आरोग्य जपावे ह्याकरिता कायम उपयोगी ठरणारा हा एक दस्तऐवज असून तो संग्रहनीय असायला हवा असे उद्गार व्यक्त केले .      
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोलाची स्मरणिका , टेलिफोन डिरेक्टरी आणि चिकित्सा पत्रिकेचे प्रकाशन रविवारी दिनांक २७ ऑगस्ट २०२३ ला स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा ,अकोला येथे प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ . गजानन नारे यांचे शुभहस्ते डॉ.अभयदादा पाटील , डॉ . एस .एस काळे , डॉ अनुप कोठारी , डॉ. किशोर मालोकर , डॉ .परमेश्वर जुनारे पाटील , श्री.प्रदीप गुरुखुद्दे , डॉ. डॉ. सुनील बिहाडे , डॉ. संदीप चव्हाण ,डॉ. महेश कुलकर्णी , डॉ . नरेंद्र गोंड , डॉ . तुषार मालोकार , प्रकल्प प्रमुख डॉ . योगेश पाटील , डॉ . आनंद चतुर्वेदी , डॉ . विनय दांदळे यांचे उपस्थितीत संपन्न झाले .
कार्यक्रमाचा शुभारंभ भगवान धन्वंतरी , डॉ . हॅनेमन प्रतिमा पूजन आणि दीप।प्रज्वलन करून झाले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीपीए अध्यक्ष डॉ . सुनील बिहाडे यांनी केले , त्यांनी प्रास्ताविक मध्ये त्यांच्या कार्यकाळात संपन्न झालेल्या विविध उपक्रमांचा ऊहापोह केला . ह्यानंतर पाहुण्यांचा परिचय आणि स्मरणिकेबद्दल ची भूमिका स्मरणिकेचे मराठी विभाग संपादक डॉ. विनय दांदळे यांनी मांडली , तसेच स्मरणिकेचे हिंदी विभाग प्रमुख डॉ . आनंद चतुर्वेदी यांनी स्मरणिकेचा इतिहास आपल्या मनोगतात मांडला . उपस्थित सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे यावेळी झालीत .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.योगेश पाटील यांनी केले तर आभार जि.पि.ए. चे सचिव डॉ.संदिप चव्हाण यांनी मांडलेत .
ह्यावेळी कोविद १९ मध्ये आपली सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्सचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला . स्मरणिकेचे डीटीपी व ग्राफिक्स डिझाइन करणारे सुरज भांगे यांचाही ह्यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाला अकोल्यातील जीपीए चे सदस्य डॉ.सुनील फोकमारे ,डॉ.अशोक ओळंबे , डॉ . विनोद बोर्डे , डॉ. युवराज देशमुख , डॉ . प्रशांत मुळावकर , डॉ . संदीप मानकर , डॉ . मनोहर घुगे , डॉ. अनिल तोष्णीवाल , डॉ. संजय अग्रवाल , डॉ. राजकुमार भांगडीया , डॉ. सुनील लुल्ला , डॉ . सुनील थावराणी , डॉ . अविनाश गावंडे , डॉ . पांडुरंग धांडे , डॉ . सुधीर भुजबळ , डॉ . राजेश अग्रवाल ,  डॉ. राजेंद्र वानखडे , डॉ . रवी आलिमचंदानी , डॉ . पराग जोशी , डॉ . अतुल देशमुख , डॉ . अश्विन वर्मा , डॉ. पंकज गुप्ता , डॉ . तुषार नागे , डॉ . विजय शेगावकर , डॉ . गिरीश अग्रवाल यांचेसह जीपीए चे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. अशी माहिती जि.पि.ए. चे सचिव डॉ.संदिप चव्हाण यांनी आम्हाला पत्रकाद्वारे दिली.

    Post Views:  346


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व