शिवराजे जामोदे सर कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 Jan 2023, 8:30 AM
   

तेल्हारा  : तेल्हारा तालुक्यातील जेष्ठ पत्रकार, नामवंत कवी, शिक्षक शिवराजे जामोदे कविराज यांना 6 6 6जानेवारी2023  या पत्रकार दिनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कार्य गौरव पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले  . अखिल भारतीय मराठी  पत्रकार परिषद चे तेल्हारा तालुकाध्यक्ष  प्रल्हाद ढोकणे यांच्या हस्ते शाल; श्रीफळ, व घड्याळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सर्वप्रथम आद्य पत्रकार, दर्पनचे संपादक स्व. बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या समारंभाला पत्रकार सुरेश शिंगणारे, अनंत कुमार अहेरकर, राजाभाऊ फाटकर, बंडूभाऊ खुमकर, जोशी या विविध दैनिकांची उपस्थिती होती. 
       शिवराजे जामोदे यांनी सतत पंचवीस वर्षे लोकमत, मातृभूमी,लोकसत्ता, दैनिक भास्कर या राज्य व राष्ट्रीय दैनिकांची आदर्श पत्रकारिता केली. जगातील नामवंत कलावंत, गायक, आभिनेते, अभिनेत्री, गायिका, राजकिय नेते, लेखक, कवी यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच पत्रकारिता करित असतांना विविध सामाजिक कार्यक्रमांची आयोजने केलित. शेकडो लेख लिहिलेत. तेल्हारा तालुक्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकवत ठेवले.

Connection failed: Operation not permitted