मराठा महासंघाचे वतीने जिजामाता जन्मोत्सव


 संजय देशमुख  13 Jan 2022, 4:33 PM
   

अंकोला : अखिल भारतीय  मराठा महासंघ जिल्हा शाखा अकोलचे वतीने 424 वा जिजामाता जन्मोत्सव नेहरू पार्क अकोला येथे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश ठाकरे यांचे नेतृत्वात  व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे याचे मार्गदर्शनात साजरा कण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवातीला कु. कल्याणी ठाकरे यांचे हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे प्रतीमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊंचे पूजन करून पुष्प अर्पण केले. त्यानंतर जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. हया प्रसंगी श्री राम मुळे यांनी  राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांनी स्वराज्य निर्मिती साठी अथक परिश्रम घेऊन छत्रपती  शिवरायांना प्रशिक्षण देऊन अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून अन्याया विरोधात लढण्यासाठी तयार केले व अत्यंत बलाढ्य अशा मोगल शाही,आदिलशाही निजामशाही,फिरंगी, पोर्तुगीज, व इंग्रजां विरुद्ध  गनिमी काव्याचा वापर करून त्यांना नेस्तनाबूत करून स्वराज्य निर्मिती केली. व सर्व सामान्य रयतेला न्याय मिळवून देऊन स्वराज्य निर्मिती केल्याचे प्रतिपादन विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्री राम मुळे यांनी केले. हया प्रसंगी श्री. सुरेश ठाकरे, प्रशांत गावंडे,  राम पोहरे, प्रतिक देशमुख, आदेश अंधारे, के.एम. देशमुख, मधुकरराव देशमुख, प्रा. बाहेती सर, आशिष चव्हाण, कृष्णराव बावणेर, अमोल सूर्यवंशी, अजिंक्य दंडवते, श्रीयश ठाकरे, घनश्याम दांदले, सूरज लुंगे, महेश कोरडे, राम प्रकशजी मिश्रा, योगगुरू मनोहर इंगळे, तेजस घोडे, वंदनाताई, श्रीमती इंगळे, जसवंतसिंग इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन युवक जिल्हाध्यक्ष  श्री राम पोहरे यांनी तर आभार युवक महानगर अध्यक्ष श्री प्रतिक देशमुख यांनी मानले. राष्ट्र गीता नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    Post Views:  286


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व