मुंबई- वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पात स्वयंम घोषित शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष संतोष विश्राम पवाडे कडून अडीच कोटीचा भ्रष्टाचार..‌!


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 May 2023, 5:27 PM
   

(संतोष घरत) पालघर - मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाकरिता संपादितकरण्यातआलेल्याजमिनीमध्ये न गेलेली झाडे, घरे व इतर वस्तूचा (सामानाचा) मोबदला शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष विश्राम पावडे यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून  २,६५,४० ,९४०/रकमेचा भ्रष्टाचार केला असा आरोप देवेंद्र अधिकारी यांनी दिनांक ८ मे २०२३ रोजीच्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी पालघर व उपविभागीय अधिकारी पालघर ह्यांना केला.    
        पालघर जिल्हा व इतर अनेक ठिकाणी मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाचे काम जोरदार सुरू असून अनेक ठिकाणी भूमिहीन शेतकऱ्याची फसवणूक करत तेथील दलालच कोट्याधीश झाले आहेत . हे तितकच सत्य आहे. ह्याबाबत भूसंपादन करणाऱ्या विभागाकडे अनेक तक्रारी जाऊन सुद्धा त्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे  पीडित भूमिहीन शेतकऱ्यांचे  म्हणणे आहे. 

               मौजे किराट, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. ३३५ या जमिनीचे एकूण क्षेत्र १.६२.६० (हे.आर.चौ.मी.) पैकी ९८३५ चौरस मीटर इतके क्षेत्र संपादित झालेले आहे. सदर जमिनीवर दोन राहती घरे (घर क्र. ३६८ लिना लंकेश पावडे आणि घर क्र. ४०९ - स्नेहल संतोष पावडे) आहेत. तसेच १-पोल्ट्री, १ बाथरूम, टोयलेट, २ टाकी, १ तार कंपाउंड, १ बोअरवेल, १ - ठिबक सिंचन आहे. त्यापैकी संपादित क्षेत्रामधील १- पोल्ट्री, १ बाथरूम, टोयलेट, २ टाकी, १ तार कंपाउंड, १ बोअरवेल, - - ठिबक सिंचन हे संपादित झालेले आहे. सदर जमिनीवरील असलेली वीट बांधकाम पत्रे स्वरुपाची दोन राहती घरे (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१) संपादित झालेली नाहीत. सदर घरे आजही अस्तित्वात आहेत.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष विश्राम पावडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पालघर यांची दिशाभूल करून तसेच खोटी व बोगस माहिती पुरवून वीट बांधकाम ,पत्रे स्वरुपाची दोन राहती घरे (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१ ) संपादित होत असल्याचे खोटे सांगितले. तसेच वीट बांधकाम पत्रे स्वरुपाची दोन राहती घरे (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१) ऐवजी ही घरे आर सी सी असल्याचे  खोटे सांगितले. सदर घरांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व आर्थिक संगनमत करून वीट बांधकाम पत्रे स्वरुपाची दोन राहती (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१ ) घरांचे खोटे मुल्यांकन दाखले बनवले. सदर मुल्यांकन दाखले बनवताना (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१) हे आर सी सी असल्याचे कागदोपत्री बनावट दाखले तयार केले. आणि सदर मुल्यांकन दाखल्याच्या आधारे भूमी अभिलेख कार्यालय पालघर येथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून व आर्थिक संगनमत करून भूसंपादित होत नसलेली घरे भूसंपादित होत असल्याचे कागदोपत्री दाखवले. आणि खोट्या माहितीच्या व कागदपत्राच्या आधारे तशी चुकीची व बेकायदेशीर नोंद विवरण पत्र मध्ये नमूद केली. आणि सदर घर क्र. ३६८ या घराचा एकूण ५४, १६,६९२ /- इतका मोबदला अनधिकृतपणे परस्पर   पावडे यांनी लाटला. घर क्र. ३६८ हा संपादित होत नसून आजही अस्तित्वातआहे. तसेच सदर घर क्र. ४०१ या घराचा एकूण ७९,०८,५३० /- इतका मोबदला अनधिकृतपणे परस्पर स्नेहल संतोष पावडे ह्याच्या खात्यावर जमा करण्यात आला. घर क्र. ४०१ हा संपादित होत नसून आजही अस्तित्वात आहे.
 तसेच मौजे किराट, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. ३३५ (संपादित क्षेत्र ९८३५ चौरस मीटर) व ३३८ (संपादित क्षेत्र २२४४ चौरस मीटर) या क्षेत्रामध्ये अत्यंत कमी झाडे होती. सदर झाडे व वृक्ष कृषी विभाग पालघर यांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटा व बोगस अहवाल बनविण्यात आला. सदर अहवालात अस्तित्वात नसलेली झाडे देखील दर्शविण्यात आलेली आहेत. निव्वळ शासनाचा पैसा लाटण्यासाठी सदरचे गैरकृत्य केले आहे. आणि सदरच्या गैरकृत्या अंतर्गत झाडांचा एकूण मोबदला ९५,२९,७७२ /- रुपये असा एकूण २,६५,४०,९४०/- इतका रकमेचा शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष संतोष विश्राम पावडे व इतर यांनी अनधिकृतपणे घेतला आहे. संतोष विश्राम पावडे हे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष त्यानी आपल्या पदाचा गैरवापर करून कृषी विभागाच्या व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदरचे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे.
मौजे किराट, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. ३३५ व ३३८ मधील भूसंपादित जमिनीच्या पंचनाम्यामध्ये घरांचा व जास्त प्रमाणात असलेल्या झाडांचा कोठेही उल्लेख नाही.
अध्यक्ष पदाच्या ताकदिवर यांनी शासनाची फसवणूक करून भूसंपादित होत नसलेल्या घरांचा आणि अस्तित्वात नसलेल्या झाडांचा मोबदला शासनाकडून अधिकृतपणे मिळविलेला आहे. अशी तक्रार जिल्हाधिकारी पालघर व उपविभागीय अधिकारी पालघर यांच्याकडे केली आहे. ह्या पत्रद्वारे त्याने पुढील मागण्या जिल्हाधिकारी व उपविभागी पालघर यांच्याकडे केल्या आहेत.
१) सामनेवाले यांनी शासनाची फसवणूक करून भूसंपादित होत नसलेल्या घरांचा आणि अस्तित्वात नसलेल्या झाडांचा शासनाकडून अनधिकृतपणे मिळविलेला मोबदला सामनेवाले कडून व्याजासह वसूल करण्यात यावा.
२) मौजे किराट, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. ३३५ (संपादित क्षेत्र ९८३५ चौरस मीटर) व ३३८ (संपादित क्षेत्र २२४४ चौरस मीटर) या जमिनीचे अहवाल बनविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची कायदेशीर कसून चौकशी करण्यात यावी. 
३) मौजे किराट, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. ३३५ (संपादित क्षेत्र- ९८३५ चौरस मीटर) व ३३८ (संपादित क्षेत्र २२४४ चौरस मीटर) या - जमिनीबाबत सामनेवाले यांची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.
४) सामनेवाले यांनी शासनाची दिशाभूल करून शासनाचा पैसा लुटण्याचे गैरकृत्य केल्याप्रकरणी सामनेवाले यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ह्या तक्रारीकडे जिल्हा अधिकारी पालघर  कोणती भूमिका बजावून ,पीडित शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे न्याय मिळवून देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  1820


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख