इंडोनेशियालाभूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल 46 जणांचा मृत्य़ू झाला असून 700 जण जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, 5.4-रिश्टर स्केलचा हा भूकंप पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात झाला. सियांजूर जिल्ह्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घरांसह अनेक इमारतींचं मोठं नुकसान झाल्य़ाचं म्हटलं आहे.
दक्षिण जकार्ता येथील कर्मचारी विदी प्रिमधनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के खूप तीव्र जाणवले. माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी नवव्या मजल्यावरील आपत्कालीन पायऱ्यांवरून कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सियांजूर प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन म्हणाले, मला आता मिळालेल्या माहितीवरून, एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कमीतकमी 300 लोकांवर उपचार सुरू आहेत.
इंडोनेशियाला अनेकदा बसतात भूकंपाचे धक्के
इंडोनेशिया, 27 कोटींहून अधिक लोकांचा विशाल द्वीपसमूह असून भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी यांनी वारंवार प्रभावित होतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पश्चिम सुमात्रा प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 25 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 460 हून अधिक जण जखमी झाले होते. जानेवारी 2021 मध्ये, पश्चिम सुलावेसी प्रांतात 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 6,500 जखमी झाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Post Views: 157
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay