कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांना बोलीभाषा जीवन गौरव पुरस्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Nov 2026, 10:01 AM
   

अकोला - महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य,लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी,कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांना बोलीभाषा साहित्य संस्थेचा बोलीभाषा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.या संस्थेचे ते मार्गदर्शक पदाधिकारी आहेत. बोलीभाषा साहित्य संस्थेच्या वतीने पहिले बोलीभाषा राष्ट्रीय साहित्य संमेलन २०२६ कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या   अमरावती येथील समाधी मंदिराच्या हॉलमध्ये नुकतेच संपन्न झाले.त्याच्या उद्घाटन समारंभात  संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब कडू व उद्घाटक, साहित्यिक डॉ.शोभाताई रोकडे व स्वागताध्यक्ष डॉ.प्रमोद काकडे यांचे हस्ते हा पुरस्कार देऊन  त्यांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी संमेलनाचे कार्याध्यक्ष व बोलीभाषा साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, समाजसेवी 
गिरधारीलाल सारडा,प्रा.सदाशिव शेळके,अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.राजेश मिरगे,बोलीभाषा साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.देवबाबू लूले, दिलीप बल्की यांची प्रमुख उपस्थिती होती.
   पुष्पराज गावंडे यांच्या वऱ्हाडी लेखन,कादंबऱ्यांची निर्मिती, कविता,वैचारिक आणि चरित्र लेखनाचा सन्मान म्हणून  त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांची "यलाई" या कादंबरी रसिकांनी भरभरून दाद दिली असून त्यांची "पायवाट" "मी जसा आहे तसा" "संभ्रम"  "मी आस्तिक मी नास्तिक" "सालगडी ते मोहनराव" आणि "पिल्लमपोया" ही त्यांची पुस्तके उल्लेखनिय ठरलेली आहेत.विविध वृत्तपत्रातून त्यांचे भरपूर स्तंभलेखन झाले असून २०१८ मधील वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहूमान त्यांना मिळालेला आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून त्यांनी साहित्य चळवळींना मौलिक सहकार्य केलेले असून  साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांना प्राप्त बहूमानाबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व पदाधिकारी व बोलीभाषा साहित्य संस्थाध्यक्ष प्रा.देवबाबू लूले व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

    Post Views:  94


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व